विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर परीक्षा विभाग : ऑक्टोबर/नोव्हेंबर २०१५, मार्च/ एप्रिल २०१६ च्या सर्व सत्र परीक्षा
By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:49+5:302015-07-10T21:26:49+5:30
सोलापूर : शैक्षणिक वर्षाची नुकतीच सुरुवात झालेली असताना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दोन्ही सत्रात होणार्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे ऑक्टोबर/नोव्हेंबर २0१५, मार्च/एप्रिल २0१६ चे वेळापत्रक पाहून विद्यार्थी व शिक्षकांना अभ्यासक्रमाचे नियोजन करणे सोपे झाले आहे.

विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर परीक्षा विभाग : ऑक्टोबर/नोव्हेंबर २०१५, मार्च/ एप्रिल २०१६ च्या सर्व सत्र परीक्षा
स लापूर : शैक्षणिक वर्षाची नुकतीच सुरुवात झालेली असताना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दोन्ही सत्रात होणार्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे ऑक्टोबर/नोव्हेंबर २0१५, मार्च/एप्रिल २0१६ चे वेळापत्रक पाहून विद्यार्थी व शिक्षकांना अभ्यासक्रमाचे नियोजन करणे सोपे झाले आहे. विद्यापीठाच्या स्थापनेनंतर गेल्या १0 वर्षात परीक्षा विभागाबाबतची ओरड कायम होती. पी. बी. पाटील यांनी परीक्षा नियंत्रकाची सूत्रे घेतल्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने परीक्षा विभागातील कारभार सुधारण्यावर भर दिला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, अभियांत्रिकीसाठी ऑनलाईन प्रश्नपत्रिका, पेपर तपासणीसाठी बारकोडिंग प्रणाली आदींचा वापर करीत परीक्षा विभागाच्या कामात गती वाढवली. सहा-सहा महिने निकाल लागत नाही, रिचेकिंग होत नाही, अशी ओरड होणार्या परीक्षा विभागाने यंदाच्या वर्षी आवघ्या १५ दिवसात काही अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत. प्रामुख्याने अभियांत्रिकीचे निकाल वेळेच्या आत लावून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यावर परीक्षा विभागाने भर दिला होता. विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा निकाल वेळेवर लावल्याने पुढील प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत होती. ही प्रक्रिया सुरू असतानाच आता आगामी परीक्षांच्या संभाव्य तारखाही सोलापूर विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्या आहेत. परीक्षांचे वेळापत्रक आल्याने बहुतांश महाविद्यालयांनी ते आपल्या महाविद्यालयातील नोटीस बोर्डावर विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी लावले आहे. यंदा प्रथमच वेळापत्रक लवकर जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)चौकट...क्र. परीक्षा ऑक्टोबर/नोव्हेंबर २0१५मार्च/एप्रिल २0१६१. बी.ए.,बी.कॉम., बी.एस्सी.ॲन्ड बी.एस.सी.(बायोटेक,एनटीप्री.ॲन्ड ईसीएस) २0/१0/२0१५ २२/0३/२0१६२. एम.ए. १६/११/२0१५ १५/0४/२0१६३. एम.एस.डब्लू. १६/११/२0१५ १५/0४/२0१६४. बी.बी.ए. 0७/११/२0१५ १५/0४/२0१६५. एम.कॉम. १९/११/२0१५ १५/0४/२0१६६. बी.सी.ए. 0७/११/२0१५ १८/0४/२0१६७. एम.बी.ए.डी.बी.एम.,एफई.,एसई., टी.ई., बी.ई. २६/११/२0१५ 0२/0५/२0१६८. बी.ए.,एलएल.बी.,एलएल.एम. २७/११/२0१५ 0६/0४/२0१६९. पी.जी.डी.सी.ए. १0/१२/२0१५ १५/0४/२0१६१0. एम.सी.ए. (कॉमर्स) 0२/१२/२0१५ 0२/0५/२0१६११. एम.एस्सी.,एम.सी.ए. (सायन्स), एम.ए. (कॅम्पस) १६/११/२0१५ १५/0४/२0१६१२. एम.ई., एम. फार्म १५/१२/२0१५ 0१/0६/२0१६१३. एम.सी.ए.(इंजि.) बी.आर्च.बी.फार्म. 0७/१२/२0१५ 0२/0५/२0१६१४. बी.एड., एम.एड.,बी.पी.एड.,एम.पी.एड. १५/१२/२0१५ 0२/0५/२0१६कोट...कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या निर्देशावरून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामकाजाचे नियोजन करता यावे यासाठी परीक्षा सुरू घेण्याच्या संभाव्य तारखा परीक्षा विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. बी. पी. पाटील, परीक्षा नियंत्रक, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.