काँग्रेस पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर कार्यकारिणी बैठक : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध

By Admin | Updated: April 11, 2015 01:40 IST2015-04-11T01:40:02+5:302015-04-11T01:40:02+5:30

सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणी बैठकीत प्रदेश कमिटीकडून आलेला पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

Announcement of the election of Congress office bearer: Executive Committee: The prohibition of policy of the Central and State Government | काँग्रेस पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर कार्यकारिणी बैठक : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध

काँग्रेस पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर कार्यकारिणी बैठक : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध

लापूर : सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणी बैठकीत प्रदेश कमिटीकडून आलेला पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी सायंकाळी काँग्रेस भवन येथे झाली. बैठकीत केशव इंगळे यांनी क्रियाशील सदस्यांची मुदत संपल्याने प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आलेला पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. क्रियाशील सदस्य ऑनलाइन नोंदणी: 15 मे पर्यंत, बूथ प्रतिनिधी: 28 जुलैपर्यंत, ब्लॉक कमिटी: 20 ते 31 ऑगस्ट, शहर काँग्रेस पदाधिकारी: 1 ते 15 सप्टेंबर.
बैठकीच्या सुरुवातीला शहर अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी प्रास्ताविकात बर्‍याच दिवसांनी कार्यकारिणीची बैठक होत असून, लवकरच दोन दिवसीय प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सुधीर खरटमल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती उत्सव समितीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सुशीलकुमार शिंदे यांची निवड झाल्याबद्दल व आ. प्रणिती शिंदे यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय मीडिया सेलवर निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर दोघांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी धर्मा भोसले यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय मंत्री गिरीराज यांच्या, माजी आमदार निर्मला ठोकळ यांनी भूमी अधिग्रहण कायदा करून सामान्य शेतकर्‍यांचे हित हिरावून घेणार्‍या मोदी सरकारच्या निषेधाचे ठराव मांडले. मुस्लिमांचे आरक्षण रद्द केल्याबद्दल आसिफ नदाफ यांनी तर आश्वासन देऊनही धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश न करणार्‍या फडणवीस सरकारच्या निषेधाचा ठराव महेश गडदे यांनी मांडला. बैठकीला काँग्रेसच्या नेत्या उज्‍जवला शिंदे, महापौर सुशीला आबुटे, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, ज्योती वाघमारे, माजी खासदार धर्मण्णा सादूल, नलिनी चंदेले, अलका राठोड, मनोज यलगुलवार, अशोक लांबतुरे, देवेंद्र भंडारे, राजन कामत, अजय दासरी, अंबादास गुत्तीकोंडा, चंद्रकांत कोंडगुळे, मनीष गडदे, किसन मेकाले, राहुल गायकवाड, अशोक कलशे?ी, हणमंतू सायबोळू, अमोल शिंदे, चेतन नरोटे, आरिफ शेख, जयकुमार माने, शिवलिंग कांबळे, जगदेवी नवले, फिरदोस पटेल आदी उपस्थित होते.
इन्फो..
महापौरांचे अभिनंदन
लोकांच्या भावना लक्षात घेऊन महापौर सुशीला आबुटे यांनी महापौर चषक स्पर्धा पुढे ढकलल्याबद्दल सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्याने लोकहिताची कामे करा, असा सल्ला त्यांनी दिला.

Web Title: Announcement of the election of Congress office bearer: Executive Committee: The prohibition of policy of the Central and State Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.