शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

आंदोलनांच्या काळात होणारी नासधूस चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 03:32 IST

देशात विविध ठिकाणी अन्य कारणास्तव होणाऱ्या आंदोलनांच्या काळात सरकारी व खासगी मालमत्तेची नासधूस करण्याचे प्रकार वाढत असून ही बाब चिंताजनक आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात मराठा आरक्षणासासाठी तसेच देशात विविध ठिकाणी अन्य कारणास्तव होणाऱ्या आंदोलनांच्या काळात सरकारी व खासगी मालमत्तेची नासधूस करण्याचे प्रकार वाढत असून ही बाब चिंताजनक आहे, असे मत सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी व्यक्त केले. असे प्रकार रोखायला हवेत. त्यासाठी कायद्यांत सरकार कधी दुरुस्ती करते याची आम्ही वाट पाहात बसणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला सुनावले.दलित अत्याचारविरोधी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सुरू झालेल्या आंदोलनात तसेच उत्तर भारतात कावडियांनी केलेली नासधूस याची दखल घेत सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केले. अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितले की, देशातील विविध भागांत दर आठवड्यात होणारा आंदोलनांच्या निमित्ताने तोडफोड व नासधूस होत आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आणि देशात अन्यत्र कारणास्तव झालेल्या आंदोलनांना जे हिंसक वळण लागले, त्यांचा उल्लेख त्यांनी दिला. ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित झाल्यास त्यातील मुख्य नायिकेचे नाक कापण्याची धमकी एका गटाने दिली होती. मात्र या प्रकरणी कोणावरही एफआयर दाखल झाला नाही, असेही वेणुगोपाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.>अधिकाºयांना जबाबदार धरादंगल किंवा अन्य कोणत्याही कारणाने मालमत्तेची नासधूस झाल्यास व ते रोखता न आल्यास त्या विभागातील पोलीस अधीक्षक किंवा संबंधित अधिकाºयांना जबाबदार धरले पाहिजे, असेही अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाल म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा