(निनाद) शिवसेनेच्या बैठकीत धराधरी

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:16+5:302015-08-27T23:45:16+5:30

लेण्याद्री : जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तालुका शिवसेनेचे धोरण ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांमध्ये धराधरी झाल्याने बैठक आटोपती घेण्यात आली. या शिवसेना स्टाइलने झालेल्या बैठकीच्या प्रकाराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

(Annad) at the meeting of Shiv Sena Dharadhri | (निनाद) शिवसेनेच्या बैठकीत धराधरी

(निनाद) शिवसेनेच्या बैठकीत धराधरी

ण्याद्री : जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तालुका शिवसेनेचे धोरण ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांमध्ये धराधरी झाल्याने बैठक आटोपती घेण्यात आली. या शिवसेना स्टाइलने झालेल्या बैठकीच्या प्रकाराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
बाजार समितीची सोसायटी गटातून उमेदवारी मागितल्यावरून तालुक्याच्या पूर्व भागातील एका उमेदवाराचे शिवसेनेच्या त्यांच्याच दृष्टीने आशादायी असलेल्या आक्रमक महिला नेतृत्वाशी जोरदार मतभेद झाले. त्यानंतर बैठकीचे कामकाज सुरूच असताना शिवसेनेचे पूर्व भागातील नेते व शिवसेनेचे वाघ समजले जाणारे पंचायत समितीचे नेतृत्व केलेल्या भाऊबली नेत्याने याच मुद्यावरून प्रत्यक्ष नाव न घेता आशादायी नेतृत्वाला चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

Web Title: (Annad) at the meeting of Shiv Sena Dharadhri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.