(निनाद) दौंडला भीमगीतांच्या कार्यक्रमाला प्रतिसाद

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:14+5:302015-08-18T21:37:14+5:30

दौंड : येथे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्ताने शाहू-फुले चळवळीवर आधारित भीमगीतांचा कार्यक्रम झाला. या वेळी सुप्रसिद्ध गायक विजय सतापे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी प्रबोधनात्मक गीते गायिली. त्यांच्या गीतगायनाला उपस्थित श्रोत्यांनी दाद दिली.

(Annad) Daund to respond to the program of Bhimgita | (निनाद) दौंडला भीमगीतांच्या कार्यक्रमाला प्रतिसाद

(निनाद) दौंडला भीमगीतांच्या कार्यक्रमाला प्रतिसाद

ंड : येथे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्ताने शाहू-फुले चळवळीवर आधारित भीमगीतांचा कार्यक्रम झाला. या वेळी सुप्रसिद्ध गायक विजय सतापे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी प्रबोधनात्मक गीते गायिली. त्यांच्या गीतगायनाला उपस्थित श्रोत्यांनी दाद दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब डाळिंबे यांच्या हस्ते वामनदादा यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन दौंड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष ॲड. अजित बलदोटा यांच्या हस्ते करण्यात आले. येथील स्थानिक कलाकार राजू गायकवाड, शशी वंटे, संजय कोरे, संतोष माने, सचिन पाटोळे, गणेश घलोत या गायकांनी गीते गायिली. ज्येष्ठ कलावंत तथा माजी उपनगराध्यक्ष भास्करराव सोनवणे, नगरसेवक राजू बारवकर, आरपीआयचे युवा शहराध्यक्ष प्रकाश भालेराव, राजेश भालसेन यांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले. याप्रसंगी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष रवी कांबळे, नागसेन धेंडे, भारत सरोदे, रमेश चावरिया, मोजेस पॉल, बाबा जगताप, विष्णू सोनवणे उपस्थित होते.
फोटो ओळ : दौंड येथे भीमगीतांचा कार्यक्रम सादर करताना विजय सतापे आणि सहकारी.
18082015-िं४ल्लि-25
०००००

Web Title: (Annad) Daund to respond to the program of Bhimgita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.