अण्णाभाऊ साठे उत्सव समितीला चषक पोलीस प्रशासनाकडून गौरव : डीजेमुक्त मिरवणूक

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:33+5:302015-09-07T23:27:33+5:30

अहमदनगर : जिल्हा पोलीस प्रशासनाने सिद्धार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीला फिरता चषक देऊन सन्मानित केले आहे. एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत समितीने डीजेला फाटा देऊन शांततेत मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत डीजे नसल्याने कोणतीही आक्षेपार्ह गाणी वाजली नाहीत. त्यामुळे महिलांचा मोठा सहभाग मिरवणुकीत होता.

Annabhau Sathe Utsav Samiti receives Gaurav from Cupid Police Administration: DJ free procession | अण्णाभाऊ साठे उत्सव समितीला चषक पोलीस प्रशासनाकडून गौरव : डीजेमुक्त मिरवणूक

अण्णाभाऊ साठे उत्सव समितीला चषक पोलीस प्रशासनाकडून गौरव : डीजेमुक्त मिरवणूक

मदनगर : जिल्हा पोलीस प्रशासनाने सिद्धार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीला फिरता चषक देऊन सन्मानित केले आहे. एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत समितीने डीजेला फाटा देऊन शांततेत मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत डीजे नसल्याने कोणतीही आक्षेपार्ह गाणी वाजली नाहीत. त्यामुळे महिलांचा मोठा सहभाग मिरवणुकीत होता.
एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीने नगर शहरातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यात येऊ नये, अशी विनंती अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी समितीला केली होती. त्यांच्या या आवाहनाला समितीने प्रतिसाद देत डीजेला फाटा देण्याचा निर्णय घेतला. मिरवणूक झाली मात्र त्यात डीजे नव्हता. अत्यंत शांतता, शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक पाहून पोलिसांवरील ताणही हलका झाला. तसेच परिसरातील नागरिकही डीजे नसल्याने मिरवणुकीत सहभागी झाले होते. उत्सव समितीचे अध्यक्ष विजय पठारे, गणेश घोरपडे, सतीश खुडे, गौरव घोरपडे यांना पोलिस दलाचा चषक प्रदान करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर, अविनाश मोरे, ज्येष्ठ कार्यकर्ते राधाजी सोनवणे, विठ्ठल उमाप, शाहीर कांबळे, माजी नगरसेवक अनिल शेकटकर, प्रा. जयंत गायकवाड, अनंत लोखंडे, पंडित वाघमारे, सुनील भवर आदी उपस्थित होते. डीजेमुक्त मिरवणूक काढून समितीने नागरिकांचे आरोग्य राखले, अशा शब्दात पोलीस निरीक्षक मालकर यांनी समितीचे कौतुक केले. धार्मिक उत्सवात याच समितीचा मंडळांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन मोरे यांनी केले.

Web Title: Annabhau Sathe Utsav Samiti receives Gaurav from Cupid Police Administration: DJ free procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.