दारूमुक्त खारघरसाठी अण्णा हजारेंची भेट
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:38+5:302015-07-10T23:13:38+5:30
पनवेल : खारघर शहराला दारूमुक्त करण्यासाठी शहरात संघर्ष समितीने लढा उभारला आहे. काही दिवसांपूर्वी शहरात दारूमुक्त खारघरसाठी मोर्चा काढून रॉयल ट्युलीप हॉटेलला दारूविक्रीचा परवाना दिल्याने उत्पादन शुल्क आयुक्तांच्या निर्णयाचा निषेध केला होता. शहराला दारूमुक्त करण्याच्या दृष्टीने शहरात सह्यांची मोहीम देखील राबविण्यात येत आहे. या आंदोलनाचाच भाग म्हणून संघर्ष समितीच्या सदस्यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिध्दी याठिकाणी दि. ७ रोजी भेट घेतली. अण्णांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

दारूमुक्त खारघरसाठी अण्णा हजारेंची भेट
प वेल : खारघर शहराला दारूमुक्त करण्यासाठी शहरात संघर्ष समितीने लढा उभारला आहे. काही दिवसांपूर्वी शहरात दारूमुक्त खारघरसाठी मोर्चा काढून रॉयल ट्युलीप हॉटेलला दारूविक्रीचा परवाना दिल्याने उत्पादन शुल्क आयुक्तांच्या निर्णयाचा निषेध केला होता. शहराला दारूमुक्त करण्याच्या दृष्टीने शहरात सह्यांची मोहीम देखील राबविण्यात येत आहे. या आंदोलनाचाच भाग म्हणून संघर्ष समितीच्या सदस्यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिध्दी याठिकाणी दि. ७ रोजी भेट घेतली. अण्णांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.