अण्णा व सोनियांना गडकरी यांचे खुल्या चर्चेचे आव्हान
By Admin | Updated: March 20, 2015 02:17 IST2015-03-20T02:17:17+5:302015-03-20T02:17:17+5:30
भूसंपादन विधेयकाविरुद्ध एकवटलेल्या विरोधकांना नामोहरम करण्यास खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात उतरले आहेत.
अण्णा व सोनियांना गडकरी यांचे खुल्या चर्चेचे आव्हान
नवी दिल्ली : भूसंपादन विधेयकाविरुद्ध एकवटलेल्या विरोधकांना नामोहरम करण्यास खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात उतरले आहेत. या विधेयकाविरुद्ध मोर्चा उघडणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गडकरींनी खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. देशहितासाठी हे विधेयक पारित करण्यासाठी संसदेत सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आह