शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पाकिस्तानात गेलेल्या अंजूसाठी 'अच्छे दिन', तर भारतात आलेल्या सीमासमोर अनेक अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 16:51 IST

गेल्या काही दिवसांपासून भारतात आलेल्या सीमा आणि पाकिस्तानात गेलेल्या अंजूची बरीच चर्चा होत आहे.

Anju-Seema Haider : मागील काही दिवसांपासून भारतीय माध्यमांमध्ये पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदर आणि भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजूची कहाणी चर्चेत आहे. दोघींनी प्रेमासाठी देशाच्या सीमा ओलांडल्या. पण, या दोघींचे आयुष्य खूप वेगळे आहे. एकीकडे अंजूचे पाकिस्तानमध्ये अच्छे दिन सुरू झाले आहेत, तर भारतात आलेल्या सीमाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सीमा हैदरवर गुप्तहेर असल्याचा ठपका लागला आहे, तर तिकडे अंजूवर पैशांचा पाऊस पडत आहे. 

पाकिस्तानात अंजूचे अच्छे दिनअंजूने आपल्या पतीला सोडले आणि थेट पाकिस्तान गाठले. अंजूने पाकिस्तानला जाण्यापूर्वी सांगितले होते की, ती फक्त तिच्या मित्राला भेटण्यासाठी तिथे जात आहे. पाकिस्तानात राहण्याचा, लग्न करण्याचा किंवा धर्म बदलण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता. पण तिथे गेल्यानंतर सर्वकाही बदलले. अंजू धर्म बदलून फातिमा बनली आणि तिच्या फेसबुक मित्र नसरुल्लाहसोबत लग्नही केले. लग्न केल्यानंतर अंजूवर भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानी उद्योगपती मोहसिन खान अब्बासीने अंजूला एक मोठा प्लॉट दिला आहे. याशिवाय इतर अनेकजण विविध गिफ्ट्स देत आहेत. अंजूच्या पाकिस्तानी नागरिकत्वाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर तिला तिथे नोकरीही करता येणार आहे.

सीमावर अडचणींचा डोंगरआपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात पोहोचलेल्या सीमा हैदरची सुरुवातीला खूप चर्चा झाली. सर्व मीडियावर फक्त तिच्याच बातम्या झळकत होत्या. सोशल मीडियावरही सीमा ट्रेंड होती. पण, हळुहळू सीमावर गुप्तहेर असल्याचा ठपका बसला. यानंतर उत्तर प्रदेश एटीएसने तिची तासनतास चौकशी केली. एटीएसची चौकशी संपली, पण आता सीमा आणि सचिन मीना यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सचिन एका दुकानात कामाला होता, त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यही रोजंदारीवर काम करता. पण, आता त्यांच्यावर उदरनिर्वाहाचे संकट निर्माण झाले आहे.

सचिन मीनाच्या वडिलांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. कारण, सुरक्षेच्या कारणास्तव मीना कुटुंबातील कुणालाही घराबाहेर जाता येत नाहीये आणि त्यामुळेच त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. एकीकडे अंजू पाकिस्तानात आरामदायी आयुष्य जगत आहेत, तर दुसरीकडे सीमा हैदर आणि सचिनसमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. आता ही दोन्ही प्रकरणांमध्ये पुढे काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टhusband and wifeपती- जोडीदार