शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

एका खास उद्देशाने भारतात आलीये अंजू; आयबी आणि पोलिसांच्या तपासातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 14:58 IST

सहा महिन्यानंतर पाकिस्तानातून भारतात परतलेल्या अंजूची आयबी आणि पंजाब पोलिसांनी कसून चौकशी केली.

पाकिस्तानी नसरुल्लाहच्या प्रेमासाठी भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजू मायदेशी परतली आहे. अंजूने बुधवारी अटारी-वाघा सीमेवरून भारतात प्रवेश केला. मित्राला भेटण्यासाठी अंजून सहा महिन्यांपूर्वी टुरिस्ट व्हिसावर पाकिस्तानला गेली होती. आता अंजू परत का आली? ती कायमची भारतात आली आहे की, पाकिस्तानात परतणार आहे? तिचा भारतात येण्याचा उद्देश काय? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत. स्वतः अंजूने या प्रश्नांचा खुलासा केला आहे. 

अंजूची अनेक तास चौकशीपंजाबमध्ये आयबी आणि राज्य पोलिसांच्या गुप्तचर विभागाने अंजूची अनेक तास चौकशी केली, यावेळी अनेक खुलासे झाले. चौकशीदरम्यान अंजूने सांगितले की, ती 21 जुलै रोजी पाकिस्तानला गेली होती. पाकिस्तानी नागरिक असलेल्या नसरुल्लासोबत लग्न करण्यापूर्वी तिने ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारल्याचा खुलासाही तिने केला. त्यानंतर तिने इस्लामिक रितीरिवाजांनुसार नसरुल्लाशी लग्नही केले. मात्र, चौकशीदरम्यान अंजूने लग्नाशी संबंधित कोणतेही कागदपत्र दाखवले नाही.

'पाकिस्तानी लष्कराशी संबंध नाही'आयबी आणि पोलिसांनी अंजूची पाकिस्तानी सैन्यासोबतच्या संबंधांबद्दल चौकशी केली, ज्यात तिने सांगितले की तिचा पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही कर्मचार्‍यांशी संबंध नाही किंवा ती सैन्यात कोणाला ओळखत नाही. अंजूबाबत सर्वसामान्यांच्याच नव्हे तर पोलिसांच्याही मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत, हे विशेष.

पतीला घटस्फोट देऊन पाकिस्तानला परतणारपोलिसांनी अंजूला पाकिस्तानात परत जाण्याबाबतही विचारणा केली. त्यावर उत्तर देताना अंजूने सांगितले की, ती पती अरविंदला घटस्फोट देण्यासाठी भारतात आली आहे. या काळात ती आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करेल.

अंजू आणि नसरुल्लाची फेसबुकवर भेटअंजू, पती अरविंद आणि दोन मुलांसोबत राजस्थानच्या अलवरमध्ये राहत होती. अंजू आणि तिचा नवरा दोघेही एका खासगी कंपनीत कामाला होते. यादरम्यान अंजूची पाकिस्तानात राहणाऱ्या नसरुल्लाहशी फेसबुकच्या माध्यमातून भेट झाली आणि दोघेही प्रेमात पडले. अंजू जयपूरला माहेरी जाण्याच्या बहाण्याने पाकिस्तानला गेली. ही बातमी समोर आल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPunjabपंजाबPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट