शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अवैध सावकाराने शेतकर्‍यांच्या जमिनी हडपल्या अंजली दमानिया : खडसेंचा वरदहस्त, लिमोझीन कार जप्त करण्याची मागणी

By admin | Updated: May 26, 2016 20:56 IST

जळगाव : सावदा ता.रावेर येथील भाजपाचा माजी नगरसेवक असलेल्या नंदकुमार पाटील व त्याचा बंधू सुधाकर पाटील हे अवैध सावकारी करतात. त्यांनी मारहाण, धमक्या आणि महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या नावाचा धाक दाखवून शेतकर्‍यांची १०८ हेक्टर जमीन हडपली. त्याच्याविरुद्ध तक्रारी केल्या तर पोलीस आणि सहायक निबंधक, उपनिबंधक, प्रशासन त्या बेदखल करतात. काम करू तर जीवन जगता येईल, अशी अवस्था या शेतकर्‍यांची झाली आहे. त्यांची लहान मुले हलाखीचे जीवन जगत आहेत. हाणामारी, दमदाटीमुळे एका शेतकर्‍याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तर एका शेतकर्‍याच्या मुलाचा गळा चिरण्याचा प्रयत्नही झाला. महसूलमंत्र्यांच्या मतदारसंघात, जिल्‘ात हे जंगलराज आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ती अंजली दामानिया यांनी गुरुवारी जळगावात पत्रकारांशी बोलताना केला.

दमानिया बुधवारी दुपारी जळगाव शहरात दाखल झाल्या. तापी महामंडळाकडून काही प्रकल्पांची माहिती त्यांनी घेतली. गुरुवारी त्यांनी सकाळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांची भेट घेऊन महसूलमंत्री खडसे यांच्या जावयाची लिमोझीन कार जप्त का केली जात नाही, असा जाब त्यांना विचारला. आरटीओ यांनी आपल्याकडे लेखी तक्रार नसल्याचे कारण दिले असता दमानिया यांनी लागलीच दोन पानी तक्रार लिहून दिली. त्यात त्यांनी खडसे यांच्या जावयाची लिमोझीन कार ४८ तासात तपासणीसाठी बोलवा, याबाबत कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी केली. तसेच जिल्‘ात एमएच १९, १९१९ या क्रमांकाच्या किती चारचाकी आहेत, त्यांचे मालक कोण आदी माहितीही आरटीओ यांच्याकडे मागितली, पण आरटीओ यांनी ही माहिती कामाचा दबाव अधिक असल्याने एक दिवसात किंवा लागलीच देता येणार नाही. लिमोझीन कारची तपासणी ४८ तासात करू, गरज भासली तर या कारचे मालक असलेले खडसे यांचे जावई डॉ.प्रांजल खेवलकर यांनाही आरटीओ कार्यालयात बोलावू, असे स्पष्टीकरण दिले.

दमानिया यांनी दुपारी लघु पाटबंधारे विभागात जाऊन पद्मालय २ प्रकल्पाबाबतची माहिती घेतली. ती माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर दमानिया या संबंधितांवर चिडल्या. सुमारे दीड तास त्यांनी लघु पाटबंधारे विभागात प्रकल्पाच्या फायलींद्वारे माहिती घेतली. नंतर दमानिया यांनी शेतकर्‍यांना सावकाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासंबंधी जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक मुद्दे मांडले. त्यांच्यासोबत सावकारग्रस्त १८ शेतकरीही होते. नंतर त्या ४ वाजेच्या सुमारास जळगाव येथून मुक्ताईनगरकडे रवाना झाल्या.