शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 21:07 IST

गुजरातमध्ये केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या पशुधन व अन्न विश्लेषण आणि अध्ययन केंद्राच्या प्रयोगशाळेने यासंदर्भात एक अहवाल दिला आहे.

तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी असल्याचा आरोप करत आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलगू देसम पक्षाने विरोधीपक्ष असलेल्या वायएसआर काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात हे लाडू अर्पण केले जातात. मंदिराचे व्यवस्थापन तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे केले जाते.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमध्ये केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या पशुधन व अन्न विश्लेषण आणि अध्ययन केंद्राच्या प्रयोगशाळेने यासंदर्भात एक अहवाल दिला आहे. काय आहे लॅब अहवाल? -अहवालानुसार, वायएसआरसीपी सत्तेत असताना प्रसिद्ध तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आढळून आली. तुपात फिश ऑइल, बीफ फॅट आणि चरबीचे अंश आढळून आले होते. तसेच, चरबी एक अर्ध-घन पांढरे चरबी उत्पादन आहे, जे डुकरांच्या चरबीयुक्त उतकांपासून घेतले जाते. तिरुपती लाडूवरून आरोप -तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंसंदर्भातील लॅबच्या अहवालानंतर, आंध्र प्रदेशात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. यामुद्द्यावरून मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वायएस जगन मोहन रेड्डी यांना कोंडीत पकडत, आरोप केला होता की, मागील वायएसआरसीपी सरकारने तिरुमला येथे तिरुपती लाडू प्रसादम तयार करण्यासाठी तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली. हा प्रसाद भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना दिला जातो. एवढेच नाही तर, तिरुमलाचे लाडू देखील निकृष्ट साहित्यापासून तयार करण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी केला होता. 

अमरावती येथे एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी असेही म्हटले होते की, लाडू तयार करण्यासाठी आता शुद्ध तुपाचा वापर केला जात आहे आणि मंदिरातील प्रत्येक गोष्ट सॅनिटाइज करण्यात आली आहे. यामुळे गुणवत्तेतही मोठा सुधार झाला आहे.

दरम्यान, यासंदर्भात बोलताना वायएसआरसीपीचे ज्येष्ठ नेते बी. करुणाकर रेड्डी गुरुवारी (19 सप्टेंबर) म्हणाले, सीएम नायडू यांनी केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी तिरुपती मंदिरातील लाडू बनवताना निकृष्ट साहित्य आणि प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोप केला आहे. करुणाकर रेड्डी यांनी आरोप केला की नायडू यांनी विरोधी पक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांना टार्गेट करण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केले आहे.

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूTempleमंदिरAndhra Pradeshआंध्र प्रदेश