करमाळा तालुका पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल सुरवसे
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:33+5:302015-08-26T23:32:33+5:30
करमाळा : करमाळा तालुका गटसचिवांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल गोरख सुरवसे यांची तर उपाध्यक्षपदी नितीन अर्जुन दळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

करमाळा तालुका पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल सुरवसे
क माळा : करमाळा तालुका गटसचिवांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल गोरख सुरवसे यांची तर उपाध्यक्षपदी नितीन अर्जुन दळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तालुका गटसचिव सह. पतसंस्थेच्या नूतन संचालक मंडळाची नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठीची बैठक सहायक निबंधक पांडुरंग रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस पतसंस्थेचे संचालक बबनराव मेहेर, लक्ष्मण थोरात, बाबासाहेब ताकमोगे, सदाशिव पाटील, राजेंद्र चांगण, अनिल माने, छगन पायघन, अनिल सुरवसे, नितीन दळवे आदी उपस्थित होते. पतसंस्थेच्या अध्यक्षपदासाठी अनिल सुरवसे व उपाध्यक्षपदासाठी नितीन दळवे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर जिल्हा बँकेचे संचालक माजी आ. जयवंतराव जगताप, बाजार समितीचे संचालक वैभवराजे जगताप यांनी सत्कार केला.