सीबीआयच्या संचालकपदी अनिल सिन्हा यांची नेमणुक
By Admin | Updated: December 3, 2014 04:49 IST2014-12-03T04:49:35+5:302014-12-03T04:49:35+5:30
आयपीएस अनिल कुमार सिन्हा यांची सीबीआयच्या संचालकपदावर नेमणुक करण्यात आली आहे.

सीबीआयच्या संचालकपदी अनिल सिन्हा यांची नेमणुक
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, ३ - आयपीएस अनिल कुमार सिन्हा यांची सीबीआयच्या संचालकपदावर नेमणुक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य न्यायधीश एच.एल. दत्तू आणि विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सिन्हा यांची संचालक पदावर नेमणुक केली आहे. याकरता ४० अधिका-यांच्या यादीतून सिन्हा यांची निवड करण्यात आली आहे. माजी सीबीआय संचालक रणजीत सिन्हा यांच्यावर २जी स्पेक्ट्रम प्रकरणी सुप्रिम कोर्टाने ताशेरे ओढले होते. त्यामुळे रणजीत सिन्हा यांची काराकीर्द वादग्रस्त ठरलीच पण सीबीआयच्या निपक्षपातीपणावरही शंका उपस्थित केली जाऊ लागल्याने रणजीत सिन्हा यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यामुळे संचालक पद कुणाकडे सोपवले जाईल याबाबत देशभरात उत्सुकता होती.
अनिल कुमार सिन्हा यांची १९७९ साली बिहारमध्ये आयपीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच त्यांना राष्ट्रपती पदकानेही गौरवण्यात आले आहे. सीबीआयच्या संचालकपदी नेमणूक होण्यापूर्वी २०१३ साली ते केंद्रीय दक्षता आयोग (CVC) मध्ये कार्यरत होते.