अनिल देशमुख....
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:14+5:302015-02-20T01:10:14+5:30
युती शासनातर्फे जिल्ावर अन्याय

अनिल देशमुख....
य ती शासनातर्फे जिल्ह्यावर अन्यायअनिल देशमुख : वार्षिक योजनेच्या निधीत केवळ ११ टक्के वाढनागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे नागपुरातील तसेच अर्थमंत्री विदर्भाचे असतानादेखील भाजप-शिवसेना युती शासनाकडून नागपूर जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत केवळ ११ टक्क्यांनी वाढ केली असून ते जिल्ह्यावर अन्यायकारक असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्याच्या विकासासाठी दरवर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून राज्य शासनाच्यावतीने विविध कामांसाठी निधी दिला जातो. या योजनेच्या माध्यमाने जिल्ह्यात विकास कामे केली जातात. राज्यात आघाडी सरकार असताना या निधीमध्ये दरवर्षी वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न राहीला. त्यामुळेच सन २०१०-११ मध्ये हा निधी ११७ कोटी रुपये होता. यात ३७ टक्क्यांनी वाढ करून हा निधी १६० कोटी करण्यात आला होता. तसेच २०१४-१५ मध्ये त्यात ३० टक्के वाढ करून १७५ कोटींवरून २२५ कोटीवर नेण्यात आली, अशी माहिती त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. परंतु भाजन-शिवसेनेचे शासन राज्यात आल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या. मुख्यमंत्री नागपुरातील तसेच अर्थमंत्री विदर्भातील असताना नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. नुकत्याच नागपूर येथील जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निधीत केवळ ११ टक्के वाढ करून २२५ कोटीवरून हा निधी केवळ २५० कोटी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शेतकरी विविध नैसर्गिक संकटात सापडले आहेत. पॅकेजच्या नावाखाली युती शासन शेतकऱ्यांच्या तोंडांना पाने पुसण्याचे काम करीत आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यात येत असल्याचे देशमुख म्हणाले. (प्रतिनिधी)