शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

नूपुर शर्माच्या अटकेसाठी देशात विविध ठिकाणी संतप्त निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 09:37 IST

Nupur Sharma : शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर मुस्लीम समाजाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून दिल्ली, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, तेलंगणा, पंजाब, मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातील काही शहरांत नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात निदर्शने  केली.

नवी दिल्ली :  एका विशिष्ट धर्माविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांच्या अटकेची मागणी करीत शुक्रवारी मुस्लीम समाजाच्या लोकांनी  देशांतील काही राज्यांत विविध ठिकाणी निदर्शने, घोषणाबाजी केली. यादरम्यान, काही ठिकाणी गोळीबार, दगडफेकीच्या घटना घडल्या. 

 शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर मुस्लीम समाजाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून दिल्ली, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, तेलंगणा, पंजाब, मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातील काही शहरांत नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात निदर्शने  केली. दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीबाहेर शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर जमलेल्या जमावाने नूपुर शर्मा व नवीनकुमार जिंदल यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करीत शांततेत निदर्शने केली. 

डोडा, किश्तवाडमध्ये संचारबंदी...भाजप नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील डोडा, किश्तवाडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. भद्रवाह आणि किश्तवाडमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, काश्मीरच्या काही भागांतही मोबाइल इंटरनेट बंद करण्यात आले आहे. श्रीनगरसह काश्मीरच्या काही भागांत बंदसारखी स्थिती आहे.  चौकाचौकात पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. भद्रवाहमध्ये दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या. निर्बंधाचे उल्लंघन करीत काही लोक रस्त्यावर आले आणि घोषणाबाजीदरम्यान दगडफेक केली. या प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर झळकल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशात सहा शहरांत निदर्शनेउत्तर प्रदेशातील प्रयागराज, सहारनपूर, बाराबंकी, मुरादाबाद, उन्नाव, देवबंदसह अनेक शहरात भाजपच्या दोन नेत्यांविरुद्ध निदर्शन केली. सहारनपूरमध्ये तोडफोड आणि प्रयागराजमध्ये दगडफेकीची घटना घडली. प्रयागराजमध्ये निदर्शकांनी प्रादेशिक सशस्र पोलीस दलाचे वाहन जाळले. अनेक ठिकाणी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.कर्नाटकातील बेळगावीमध्ये फोर्ट रोडवर वीज वाहक तारेला नूपुर शर्माचा पुतळा फासावर लटकावण्यात आला होता. तथापि, पोलिसांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हा पुतळा तातडीने हटविला.

कोलकात्यामध्ये घोषणाबाजीपश्चिम बंगालच्या कोलकाता आणि हावडामध्ये निदर्शकांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली.  काही निदर्शकांनी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. निदर्शकांंना पांगविण्यासाठी  अश्रुुधुराच्या माऱ्यासोबत लाठीमार करावा लागला.

रांचीत एकाचा मृत्यू...झारंखडची राजधानी असलेल्या रांची शहरातील मुख्य रस्त्यावर उतरून जमावाने घोषणाबाजी करीत निदर्शन केली. संतप्त जमावाला नियंत्रित करताना पोलिसांना लाठीमार आणि हवेत गोळीबार करावा लागला. निदर्शकांपैकी  एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तथापि, पोलिासांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. निदर्शकांनी गोळीबाराच्या २५ फैरी झाडल्या. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पोलिसांनी १५० फैरी हवेत झाडल्या. पोलिसांनी गोळीबार केला नसता, तर स्थिती नियंत्रणाबाहेर गेली असती. रांची शहरातील सुजाता चौक ते फिरायालाल चौकांपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  

बिहारमध्येही घोषणाबाजीबिहारच्या भागलपूर जिल्ह्यातही घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. नूपुर शर्मांच्या अटकेची मागणी करणारे फलक लावले होते. जिल्ह्यातील दोन बाजार बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, मुझफ्फरपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून नूपुर शर्मा, नवीन जिंदाल आणि  स्वामी यती नरसिंहानंद यांच्याविरुद्ध  तक्रार दाखल केली आली आहे. कोर्ट यावर २१ जून रोजी सुनावणी घेणार आहे.

टॅग्स :BJPभाजपा