शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला चावल्याचा राग; संतापलेल्या बापाने कापले कुत्र्याचे पाय, पोलिसांत तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 11:27 IST

या क्रुर घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्यात आरोपी कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे.

भोपाळ:मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात एका माणसाने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. आपल्या मुलाला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला, त्यामुळे रागाच्या भरात त्या व्यक्तीने कुत्र्याचे पाय कापून त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, ही घटना सुमारे एक महिन्यापूर्वी सिमरिया ताल गावात घडली होती, पण रविवारी कुत्र्याला मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

आरोपीविरोधात तक्रार दाखलदुरुन चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये माणूस कुत्र्याला दोरीने बांधून लोखंडी रॉने मारहाण करताना दिसत आहे. काही वेळानंतर तो व्यक्ती धारदार शस्त्राने कुत्र्याचे पाय कापून त्याला ठार करतो. यावेळी वेदनेने व्हिवळणाऱ्या कुत्र्याच्या वेदना त्या पाषणह्रदयी माणसाला कळत नाहीत. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या पीपल फॉर अॅनिमल्सच्या कार्यकर्त्याने ग्वाल्हेर पोलिसांकडे याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

कुत्र्याने मुलाला चावल्याचा रागपोलिस अधीक्षक अमित सांघी यांनी पीटीआयला सांगितले की, तक्रारीनंतर त्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कुत्र्याने त्या व्यक्तीच्या मुलावर हल्ला करुन त्याचा चावा घेतला होता. यामुळे संतापलेल्या आरोपी सागर विश्वासने त्या कुत्र्याला निर्घृणपणे ठार केले. या घटनेनंतर त्या व्यक्तीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीसपोलिसांनी सांगितले की, आरोपीला न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली जाईल. पीपल फॉर अॅनिमल्स या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्या छाया तोमर यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहिता 429 (पाशवी वर्तन, विषबाधा, अपंगत्व, हत्या) आणि प्राण्यांवरील क्रूरतेची कलमे दाखल केली आहेत. आरोपींविरुद्ध प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशgwalior-pcग्वालियरdogकुत्रा