शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत शेतकरी संघटनेची नाराजी

By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:51+5:302015-01-15T22:32:51+5:30

नागपूर: नैसिगर्क आपत्तीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना त्याला आवश्यक मदत करण्याचे सोडून केवळ ४० टक्के मदत करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारल्याने शेतकरी संघटनेने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Angered farmers to the help of poor helpers | शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत शेतकरी संघटनेची नाराजी

शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत शेतकरी संघटनेची नाराजी

गपूर: नैसिगर्क आपत्तीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना त्याला आवश्यक मदत करण्याचे सोडून केवळ ४० टक्के मदत करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारल्याने शेतकरी संघटनेने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष राम नेवले यांनी यासंदभार्त एक पत्रक प्रिसद्धीला िदले असून शेतकर्‍यांबाबत सरकार असंवेदनशील आहे,अशी टीका केली आहे.
िवरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी कापसाला ६ हजार, सोयाबीनला ५ हजार आिण धानाला ३ हजार प्रती िक्वंटल रुपये भाव द्यावा, अशी मागणी केली होती. ते मुख्यमंत्री झाल्याने शेतकर्‍यांना त्यांच्याकडून मोठी आशा होती. मात्र ती फोल ठरली. नागपूर िहवाळी अिधवेशनात शेतकर्‍यांसाठी पॅकेजची घोषणा झाली. पण त्यातील ४० टक्के रक्कमचा म्हणजे २ हजार कोटींच्या मदतीचा िनणर्य एक मिहन्याने घेण्यात आला. बािधत शेतकर्‍याला त्यापैकी िकती रक्कम िमळणार याबाबत काहीच स्पष्टता नाही, असे नवले यांचे म्हणने आहे.
शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबिवण्यासाठी उत्पादन खचर् आिण त्यावर ५० टक्के नफा एकत्र करून हमी भाव िनिश्चत करावे व दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार आिण फळ िपकांसाठी हेक्टरी ६५ हजार रुपये मदत करावी, अशी मागणी नवले यांनी केली. (प्रितिनधी)

Web Title: Angered farmers to the help of poor helpers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.