CoronaVirus: लॉकडाऊनमुळे अडकलेला पती परतला घरी; पत्नी म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 03:14 AM2020-04-19T03:14:06+5:302020-04-19T07:05:14+5:30

आरोग्याच्या दृष्टीने दक्ष असलेल्या पत्नीनेदेखील घेतली खबरदारी ​​​​​​​

Andhra woman refuses to let husband enter home without COVID test | CoronaVirus: लॉकडाऊनमुळे अडकलेला पती परतला घरी; पत्नी म्हणाली...

CoronaVirus: लॉकडाऊनमुळे अडकलेला पती परतला घरी; पत्नी म्हणाली...

Next

नेल्लोर : लॉकडाऊनमुळे आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे अडकून पडलेल्या व नंतर गावी परतलेल्या पतीला त्याने कोरोना चाचणी करून घेतल्यानंतरच पत्नीने घरात प्रवेश दिला. आरोग्याच्या दृष्टीने दक्ष असल्यानेच पत्नीने ही खबरदारी घेतली.

नेल्लोर जिल्ह्यातील वेंकटगिरी येथे ही घटना घडली. लॉकडाऊनमुळे अडकून पडलेला पती काही दिवसांनी परतला पण त्याला पत्नीने घरात घेतले नाही. कोरोनाची चाचणी करून घेतल्यानंतर व आजार झाला नसल्याचे सिद्ध झाल्यानंतरच घरात प्रवेश मिळेल, असे पत्नीने आपल्या नवऱ्याला बजावले. शेवटी निरुपाय होऊन त्याने ही चाचणी करून घेऊन पत्नीच्या मनाचे समाधान केले. पती नेल्लोरमधील सोन्या-चांदीच्या दुकानात नोकरीला होता. गेल्या महिन्यापासून लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे तो तिथेच अडकून पडला होता. 

Web Title: Andhra woman refuses to let husband enter home without COVID test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.