शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतात हिरा सापडला अन् क्षणात शेतकरी लखपती झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 13:51 IST

कुरनूल जिल्ह्यातील एक शेतकरी एका रात्रीत लखपती बनला आहे. शेतकऱ्याला शेतामध्ये एक हिरा सापडल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देकुरनूल जिल्ह्यातील एक शेतकरी एका रात्रीत लखपती बनला आहे. शेतकऱ्याला शेतामध्ये एक हिरा सापडल्याची घटना समोर आली आहे. शेतात नांगरत असताना मिळालेल्या हिऱ्याची बाजारातील किंमत ही जवळपास 60 लाख आहे.

हैदराबाद/कुरनूल - कोणाचं नशीब हे कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. रातोरात लखपती झाल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. अशीच एक घटना आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात घडली आहे. कुरनूल जिल्ह्यातील एक शेतकरी एका रात्रीत लखपती बनला आहे. शेतकऱ्याला शेतामध्ये एक हिरा सापडल्याची घटना समोर आली आहे. शेतात नांगरत असताना मिळालेल्या हिऱ्याची बाजारातील किंमत ही जवळपास 60 लाख आहे.

शेतकऱ्याने मिळालेला हिरा एका स्थानिक व्यापाऱ्याला विकला. व्यापाऱ्याने या शेतकऱ्याला हिऱ्याच्या बदल्यात 13.5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि पाच तोळे सोने दिले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कुरनूल जिल्हातील गोलावनेपल्ली गावातील एका शेकऱ्याला शेत नांगरत असताना एक हिरा मिळाला. हिऱ्याची साईज, रंग आणि वजन याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कुरनूल जिल्ह्यामध्ये हिरा मिळाल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 12 जून रोजी याच जिल्ह्यातील एका मेंढपाळाला 8 कॅरेटचा एक हिरा मिळाला होता. मेंढपाळाने हा हिरा 20 लाखांना विकला होता. मात्र, त्या हिऱ्याची खरी किंमत होती 50 लाख रुपये होती. पावसाळा सुरू झाला की कुरनूल जिल्ह्यात हिऱ्यांचा शोध सुरू होतो. हिऱ्याच्या शोधात लोक येथे येत असतात. हिऱ्याचे क्षेत्र अशी या ठिकाणाची ओळख आहे.

मध्य प्रदेशमधील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यामध्ये काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे एका मजुराचं नशीब फळफळलं होतं. जमिनीत खोदकाम करत असताना मजुराला 42.59 कॅरेटचा एक मौल्यवान हिरा सापडला होता. मोतीलाल प्रजापती असं हिरा सापडलेल्या मजुराचं नाव असून खाणीत सापडलेला हा सगळ्यात जास्त वजनाचा दुसऱ्या क्रमांकाचा हिरा होता. माझ्या कुटुंबियांसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं मोतीलालने म्हटलं होतं. जी रक्कम मिळेल ती रक्कम कुटुंबाच्या भल्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार असल्याचंही त्याने सांगितलं होतं. याआधी 1961 मध्ये येथे 44.55 कॅरेटचा सर्वात मोठा आणि मौल्यवान हिरा सापडला होता.

 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशFarmerशेतकरी