शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेच्या निषेधार्थ टीडीपीकडून आंध्र प्रदेश बंदची हाक, पवन कल्याण यांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 09:56 IST

पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने (जेएसपी) या बंदला पाठिंबा दिला आहे.

विजयवाडा : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर राज्यात निदर्शने तीव्र झाली आहेत. सरकारी निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ तेलगू देसम पार्टीने (टीडीपी) सोमवारी आंध्र प्रदेश बंदची हाक दिली आहे. याचबरोबर, पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने (जेएसपी) या बंदला पाठिंबा दिला आहे.

आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी (9 सप्टेंबर) सीआयडीने नंदयाल येथून अटक केली होती. एका दिवसानंतर, चंद्राबाबू नायडू यांना रविवारी (10 सप्टेंबर) सकाळी विजयवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, एका निवेदनात आंध्र प्रदेश टीडीपीचे अध्यक्ष के अचन्नयडू यांनी पक्षाचे कार्यकर्ते, सामान्य लोक आणि नागरी समाजाला आंदोलनात सहभागी होऊन ते यशस्वी करण्याची विनंती केली.

300 कोटी रुपयांचा घोटाळाआंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळातील कथित घोटाळ्याप्रकरणी विजयवाडा येथील स्थानिक न्यायालयाने चंद्राबाबू नायडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आंध्र प्रदेश सीआयडीचे प्रमुख एन संजय यांनी शनिवारी सांगितले की, कौशल्य विकास महामंडळाच्या निधीच्या गैरवापराशी संबंधित फसवणूक प्रकरणात चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. हा घोटाळा 300 कोटी रुपयांचा आहे.

पवन कल्याण यांचा राज्य सरकारवर निशाणाजनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसवर 'असामाजिक कृत्ये' केल्याचा आरोप केला. राज्यातील जगन मोहन सरकार विरोधी पक्षांना त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. एका निवेदनात पवन कल्याण यांनी जेएसपी कार्यकर्त्यांना बंदमध्ये शांततेने सहभागी होण्यास सांगितले.

शहरात कलम 144 लागूचंद्राबाबू नायडू यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर त्यांना राजमुंदरी मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले आहे. दरम्यान, कारागृहात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विजयवाडा न्यायालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने टीडीपी कार्यकर्ते जमले असतानाही पोलीस अधिकाऱ्यांनी चंद्राबाबू नायडूंना मध्यवर्ती कारागृहात घेऊन गेले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राजमुंदरी पोलिसांनी शहराच्या हद्दीत कलम 144 लागू केले आहे.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेशTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टी