शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

VIDEO : ...आता तोपर्यंत विधानसभेत पाय ठेवणार नाही; भर पत्रकार परिषदेत ढसा-ढसा रडले चंद्राबाबू नायडू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 5:43 PM

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत महिला सक्षमीकरणावरील चर्चेदरम्यान 71 वर्षीय नायडू त्यांच्याविरोधात आणि त्यांच्या पत्नीविरोधात वायएसआरसीपीच्या सदस्यांनी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यांवरून भावूक आणि व्यथित झालेले दिसले.

आता चालू कार्यकाळात आपण विधानसभेत पाय ठेवणार नाही, अशी भीष्म-प्रतिज्ञा तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष तथा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी मंगळवारी केली. सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आपला आणि आपल्या पत्नीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी चंद्राबाबू नायडू भावूक झाले होते. (Chandrababu naidu upset by the insult of his wife.)

चंद्राबाबू म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतरच विधानसभेत परतेन -नायडू म्हणाले, या घटनेनंतर आपण विधानसभेत सहभागी होणार नाही. मी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतरच सभागृहात परतेन. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत महिला सक्षमीकरणावरील चर्चेदरम्यान 71 वर्षीय नायडू त्यांच्याविरोधात आणि त्यांच्या पत्नीविरोधात वायएसआरसीपीच्या सदस्यांनी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यांवरून भावूक आणि व्यथित झालेले दिसले.

नायडू ढसा-ढसा रडले -यानंतर, मंगलागिरी येथील टीडीपीच्या राज्य मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नायडूंना अश्रू अनावर झाले आणि ते ढसा-ढसा रडले. ते म्हणाले, मी सत्तेत असो वा सत्ते बाहेर, माझी पत्नी कधीही राजकारणात आली नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिने मला प्रोत्साहन दिले. तिने कधीही राजकारणात हस्तक्षेप केला नाही. तरीही त्यांनी (YSRCP) माझ्या पत्नीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला.

अध्यक्षही झाले मूकदर्शक - चंद्राबाबूचंद्राबाबू म्हणाले, सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, सत्ताधारी पक्षाचे सदस्य जेव्हा माझ्या पत्नीसंदर्भात अपशब्द बोलत होते, तेव्हा अध्यक्ष मूकदर्शक होऊन फक्त बघत राहिले. उर्वरित कार्यकाळात विधानसभेपासून दूर राहण्याच्या माझ्या निर्णयावरही मला बोलू दिले नाही. गेल्या अडीच वर्षांपासून मी अपमान सहन करत आहे. पण, आता मी माझा लढा जनतेत नेऊन त्यांचा पाठिंबा घेणार आहे. मुख्यमंत्री म्हणून जनतेचा जनादेश मिळाल्यावरच मी विधानसभेत पाय ठेवेन.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूPoliticsराजकारणAndhra Pradeshआंध्र प्रदेश