शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद बरखास्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय; विरोधकांना मोठा धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 11:34 IST

कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरु होईल

अमरावती - आंध्र प्रदेशमधील जगनमोहन रेड्डी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत विधान परिषद बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजूर करण्यात आलं आहे. वायएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवाडा अमरनाथ यांनी याबाबत माहिती दिली आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर आंध्र प्रदेश सरकारचं विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 

चंद्राबाबू नायडू यांचा विरोध कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरु होईल. या अधिवेशनात विधान परिषद बरखास्त करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होईल. सूत्रांनुसार माजी मुख्यमंत्री अन् टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाकडून सरकारच्या या प्रस्तावाचा विरोध करण्यात येणार आहे. रविवारी नायडू यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. ज्यामध्ये पक्षाचे २१ आमदार विशेष अधिवेशनावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. 

आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषदेत ५८ सदस्य आहेत. जगन मोहन रेड्डी यांच्या हातात राज्याची सत्ता असली तरी विधान परिषदेत चंद्रबाबू नायडू यांचे बहुमत आहे. या सभागृहात टीडीपीचे २७ तर वायएसआरचे ९ सदस्य आहेत. विधान परिषदेत जगन मोहन रेड्डी यांच्या राज्याच्या तीन राजधान्या या प्रस्तावाला अडकवलं गेले. विधान परिषदेने हा प्रस्ताव सिलेक्ट समितीकडे पाठवला. त्यामुळे या प्रस्तावाला विलंब होईल.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू