आंध्र प्रदेशात बोट उलटून 13 जणांना जलसमाधी

By Admin | Updated: April 28, 2017 21:01 IST2017-04-28T20:20:18+5:302017-04-28T21:01:37+5:30

आंध्र प्रदेशातील अनंतपूरम जिल्ह्यातील एका तलावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा बुडून मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

In Andhra Pradesh, the boat receded and 13 people got water borne | आंध्र प्रदेशात बोट उलटून 13 जणांना जलसमाधी

आंध्र प्रदेशात बोट उलटून 13 जणांना जलसमाधी

ऑनलाइन लोकमत
अनंतपूरम, दि. 28 - आंध्र प्रदेशातील अनंतपूरम जिल्ह्यातील एका तलावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा बुडून मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर, या दुर्घटनेतील चार जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, अनंतपूरम जिल्ह्यातील गुंटाकाल ब्लॉक येथील एरटिम्मा राजू तलावात बोटीतून नागरिक जात असताना ही घटना घडली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून अद्याप चार जण बेपत्ता असल्याचे समजते. दरम्यान, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. तसेच, बेपत्ता असलेल्यांची आणि मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे अद्याप मिळालेली नाहीत.
डेक्कन हेराल्डने दिलेल्या माहितीनुसार, जवळच्या गावातील मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जात असताना ही घटना घडली. यावेळी 20 लोक या बोटीत प्रवास करत होते. त्यातील 13 जण हे एकाच कुटुंबातील होते. 
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून संबंधित जिल्हातील अधिका-यांना बचावकार्य सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.  
सविस्तर वृत्त लवकरच...
 

Web Title: In Andhra Pradesh, the boat receded and 13 people got water borne