शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

VIDEO:  लाईव्ह डिबेटमध्ये गोंधळ, भाजपा नेत्याला फेकून मारली चप्पल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 14:53 IST

Andhra Pradesh BJP leader hit with slippers : आंध्र प्रदेशातील तेलुगु न्यूज चॅनेलवरील लाईव्ह चर्चेमध्ये असे काही घडले, की जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देचॅनेलवरील चर्चेदरम्यान वाद झाला आणि चर्चेत सहभागी एका सदस्याने भाजपा नेत्याला चक्क चप्पल फेकून मारल्याचा प्रकार घडला.

अमरावती : न्यूज चॅनेलवर एखाद्या मुद्द्यावरून होणाऱ्या चर्चेदरम्यान वाद-विवाद होताना तुम्ही पाहिलेच असेल. सत्ताधारी आणि विरोधकांच्या वक्तव्यावरून होणारे वाद देखील सामान्य आहेत. मात्र, आंध्र प्रदेशातील तेलुगु न्यूज चॅनेलवरील लाईव्ह चर्चेमध्ये असे काही घडले, की जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चॅनेलवरील चर्चेदरम्यान वाद झाला आणि चर्चेत सहभागी एका सदस्याने भाजपा नेत्याला चक्क चप्पल फेकून मारल्याचा प्रकार घडला. (andhra pradesh bjp leader vishnu vardhan reddy with slippers in live debate telugu news channel)

आंध्र प्रदेशातील जगन सरकारच्या तीन राजधानींच्या प्रस्तावानंतर अमरावतीत काम जवळजवळ थांबवले आहे. राजधानीसाठी ४३४ दिवसांपासून शेतकरी व महिलांचे आंदोलन सुरु केले. अशा परिस्थितीत न्यूज चॅनलने मंगळवारी एक लाईव्ह चर्चा केली. या चर्चेत अमरावती प्रदेशच्या संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कोलिकापुडी श्रीनिवास राव, भाजपा प्रदेश सरचिटणीस विष्णुवर्धन रेड्डी आणि इतर लोक राजधानी अमरावतीबाबतच्या चर्चेत सहाभागी होते. 

या चर्चेवेळी भाजपाच्या विष्णुवर्धन रेड्डी यांनी डॉ. कोलिकापुडी श्रीनिवास राव यांचे तेलुगू देसम पक्षासोबत ( टीडीपी) संबंध असल्याचा आरोप केला. यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली. मात्र, जेव्हा विष्णुवर्धन रेड्डी वारंवार डॉ. कोलिकापुडी श्रीनिवास राव यांचे टीडीपीसोबत संबंध असल्याचा पुनरुच्चार करु लागले,  तेव्हा डॉ. कोलिकापुडी श्रीनिवास राव यांचा संताप झाला आणि त्यांनी विष्णुवर्धन रेड्डी यांना चक्क चप्पल फेकून मारली.

या घटनेमुळे लाईव्ह चर्चेचे प्रसारण करणार्‍या अँकरला ब्रेक घेण्यास भाग पडले. या घटनेनंतर चर्चेत भाग घेणारे इतर पॅनेलचे सदस्य आश्चर्यचकित झाले. भाजपाचे राज्य युनिटचे प्रमुख सोमू वीरराजू यांनी एका ट्विटमध्ये या घटनेचा निषेध केला आहे. राज्यसभेचे खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनीही घटनेचा निषेध केला. ते म्हणाले, "जर तेलुगू देसम पक्षाची (टीडीपी) यात कोणतीही भूमिका नसेल तर चंद्रबाबू नायडूंनी हल्लेखोर डॉ. कोलिकापुडी श्रीनिवास राव यांच्या या कृत्याचा निषेध करावा." 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशBJPभाजपाTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टी