आंध्र प्रदेशमध्ये नदीत व्हॅन कोसळून २२ जण ठार
By Admin | Updated: June 13, 2015 10:30 IST2015-06-13T10:23:17+5:302015-06-13T10:30:06+5:30
तिरूपतीहून अच्युतापुरमकडे जाणारी व्हॅन डौलरेश्वम बंधा-याजवळ गोदावरी नदीत पडून झालेल्या अपघातात २२ जण ठार झाले आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये नदीत व्हॅन कोसळून २२ जण ठार
ऑनलाइन लोकमत
राजामुंद्री, दि. १३ - तिरूपतीहून अच्युतापुरमकडे जाणारी व्हॅन डौलरेश्वम बंधा-याजवळ गोदावरी नदीत पडून झालेल्या अपघातात २२ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये ९ महिला व ७ लहान मुलांचा समावेश आहे.
आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजामुंद्री येथून जवळ असलेल्या डौलरेश्वम येथे हा भीषण अपघात घडला. अपघातग्रस्त व्हॅनमधील प्रवासी तिरुमला येथे देवदर्शन करून विशाखापट्टणमधील अच्युतापुरम येथे परतत होते, त्याचवेळी त्यांच्या व्हला अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती व्हॅन भरधाव वेगाने जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी दुभाजकावर आदळून नदीत कोसळली. त्यात २२ जण मृत्यूमुखी पडले.