अंदमान निकोबारच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:24+5:302015-01-31T00:34:24+5:30
नागपूर : शारीरिक शिक्षण महाविद्यालयात शिकत असलेल्या अंदमान निकोबारच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. गोविंद पांडी पांडियन (वय २३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

अंदमान निकोबारच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
न गपूर : शारीरिक शिक्षण महाविद्यालयात शिकत असलेल्या अंदमान निकोबारच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. गोविंद पांडी पांडियन (वय २३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो ईश्वर देशमूख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात शिकत होता. महाविद्यालयाच्या सक्करदऱ्यातील होस्टेलमध्ये दुसऱ्या माळ्यावर तो राहात होता. आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास तो इतरांना दिला. सकाळी ८ वाजता त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्याने जिन्याच्या सळाखींना दुपट्याने गळफास लावला होता. या घटनेमुळे होस्टेलमध्ये एकच खळबळ निर्माण झाली. आनंद जगमोहन सिन्हा (वय २६) याने दिलेल्या माहितीवरून सक्करदरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पांडियनच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नाही. ---