...तर जम्मू काश्मीरमध्ये सत्ता सोडून देऊ - अमित शहा

By Admin | Updated: March 19, 2015 11:55 IST2015-03-19T11:53:19+5:302015-03-19T11:55:11+5:30

भाजपा राष्ट्रहितासाठी कधीच तडजोड करणार नाही, काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर पीडीपीसोबतची युतीही तोडून देऊ असे विधान भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे.

... and we will give up the rule in Jammu Kashmir - Amit Shah | ...तर जम्मू काश्मीरमध्ये सत्ता सोडून देऊ - अमित शहा

...तर जम्मू काश्मीरमध्ये सत्ता सोडून देऊ - अमित शहा

 ऑनलाइन लोकमत 

अहमदाबाद, दि. १९ - भाजपा राष्ट्रहितासाठी कधीच तडजोड करणार नाही, काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर पीडीपीसोबतची युतीही तोडून देऊ असे विधान भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. काश्मीर मुद्द्यावर आम्ही तोडगा काढण्यात यशस्वी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 
फुटिरतावादी नेता मसरत आलमच्या सुटकेने जम्मू काश्मीरमधील पीडीपी - भाजपा सरकारवर टीकेची झोड उठली आहे. सत्ताधारी फुटिरतावाद्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप विरोधक करत आहे. यापार्श्वभूमीवर अमित शहा यांनी गुजरातमधील नारायणपूरा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जम्मू काश्मीर संदर्भात भाजपाची भूमिका मांडली. सत्तेसाठी आम्ही देशहिताशी तडजोड करणार नाही, काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठीच आम्ही तिथे सरकार स्थापन केले आहे असे शहा यांनी स्पश्ट केले. काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यात आम्ही अयशस्वी ठरलो तर पीडीपीसोबतची युती तोडण्यापासून रोखू शकणार नाही असेही त्यांनी नमूद केले. भाजपा देशहिताशी तडजोड करणार हा संदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायला हवा अशा सूचनाही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले आहे.
 

Web Title: ... and we will give up the rule in Jammu Kashmir - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.