...आणि नरेंद्र मोदींचे डोळे पाणावले

By Admin | Updated: May 20, 2014 15:58 IST2014-05-20T13:17:56+5:302014-05-20T15:58:08+5:30

भारताप्रमाणेच भारतीय जनता पार्टी माझी आई आहे आणि मुलगा कधीही आईवर कृपा करत नाही तर तिची सेवा करतो असे भावूक उद्गार नरेंद्र मोदी यांनी संसदीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी काढले.

... and Narendra Modi's eyes | ...आणि नरेंद्र मोदींचे डोळे पाणावले

...आणि नरेंद्र मोदींचे डोळे पाणावले

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २० - भारताप्रमाणेच भारतीय जनता पार्टी माझी आई आहे आणि मुलगा कधीही आईवर कृपा करत नाही तर तिची सेवा करतो असे भावूक उद्गार नरेंद्र मोदी यांनी संसदीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी काढले. यावेळी नरेंद्र मोदींसह भाजपाच्या नेत्यांच्या डोळ्यात पाणी आले. कठोर प्रशासक अशी ओळख असलेल्या मोदींना भावूक झालेले बहुदा प्रथमच बघायला मिळाले. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी मोदींचे कौतुक करताना मोदींमुऴे हा दिवस बघायला मिळाल्याचे सांगत त्यांची पक्षावर कृपा झाल्याचे उद्गार काढले होते. आडवाणी यांनी अस म्हणू नये पक्ष माझ्यासाठी आईसारखा आहे आणि या आईची सेवा करण्यात आपल्याला धन्यता वाटत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी हे उद्गार काढले त्यावेळी सभागृहातल्या बहुतेक सर्व नेत्यांचे डोळे पाणावले होते.
भाजपाला आजचे दिवस हे पाच पिढ्यांच्या तपस्येमुळे व लाखो कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मिळाल्याचे सांगताना भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या खांद्यावर मी बसलो असून त्यामुळे मी मोठा वाटत असल्याचे ते म्हणाले. या भाषणानंतर त्यांनी भाजपामधल्या जुन्या जाणत्यांना व ज्येष्ठांना श्रेय देत आपण फूट पाडणारे व्यक्ती नसल्याचेही दाखवून दिले.
याच भाषणात गरीबांसाठी आपले सरकार असल्याचे सांगत पुढील पाच वर्षे आपण तन मनाने दिवसरात्र मेहनत या राष्ट्रासाठी घेणार असल्याचे मोदी म्हणाले. 

Web Title: ... and Narendra Modi's eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.