... and Hema Malini made the photo deleted | ...आणि हेमा मालिनीने फोटो केले डिलीट

...आणि हेमा मालिनीने फोटो केले डिलीट

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३ - उत्तरप्रदेशातील मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर पुन्हा एकदा असंवेदनशीलतचा आरोप झाला आहे. हेमा मालिनीवर चहूबाजूंनी टीका होत आहे. अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये मथुरेमध्ये दोन पोलिस अधिका-यांसह २१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना हेमा मालिनी मात्र मुंबईत मढ येथे चित्रीकरणामध्ये व्यस्त होत्या. 
 
त्यांनी आपल्या चित्रीकरणाचे फोटोही टि्वटवर टाकले होते. या घटनेची माहिती मिळताच हेमा मालिनी यांनी लगेच ते फोटो आपल्या टि्वटरवरुन काढून टाकले व आताच आपल्याला या हिंसाचाराची माहिती मिळाली असे सांगितले. मथुरेतल्या घटनेबद्दल ऐकून मला दु:ख झाले. माझी गरज असेल तर मी पुन्हा तिथे जाईन असे हेमा मालिनीने टि्वटमध्ये म्हटले आहे. 
 
 
वर्षभरापूर्वीही हेमा मालिनीवर असेच असंवेदनशीलतेचे आरोप झाले होते. त्यावेळी हेमा मालिनींच्या मर्सिडीज कारने एका प्रवासी वाहनाला धडक दिली होती. जखमींना त्याच अवस्थेत सोडून हेमा मालिनी दुस-या गाडीतून रुग्णालयात निघून गेल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. 
 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ... and Hema Malini made the photo deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.