..तर गंगा पाच वर्षात स्वच्छ होईल!

By Admin | Updated: September 14, 2014 02:54 IST2014-09-14T02:54:33+5:302014-09-14T02:54:33+5:30

मनात आणले तर गंगा नदी स्वच्छ करणो हे फार मोठे काम नाही. गंगा नदी स्वच्छ करणो अगदी साधे, सोपे आणि सरळ आहे. पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ हवी.

..and clean up in the Ganges during the five years! | ..तर गंगा पाच वर्षात स्वच्छ होईल!

..तर गंगा पाच वर्षात स्वच्छ होईल!

- डॉ. राजेंद्र सिंह 
मनात आणले तर गंगा नदी स्वच्छ करणो हे फार मोठे काम नाही. गंगा नदी स्वच्छ करणो अगदी साधे, सोपे आणि सरळ आहे. पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ हवी. आणि नुसती राजकीय इच्छाशक्ती कामाची नाहीतर सर्वसामान्य नागरिकांनाही याकामी पुढाकार घेत थोडीशी तरी जाण बाळगली तर पुढच्या दहा काय पाच वर्षात गंगा नदी सहज स्वच्छ होईल.
 
गंगा नदीच्या शुद्धीकरणाचे काम याच गतीने होत राहिले तर पुढच्या दोनशे वर्षातदेखील ती शुद्ध होणार नाही, अशी टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने केली. येथे विशेष उल्लेख करण्यासारखी बाब अशी की, सर्वोच्च न्यायालय असेही म्हणाले की, गंगा नदीच्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम अगदी सर्वसामान्य माणसाला समजेल या भाषेत सादर करावा.  यातच सारेकाही आले. त्यांना सर्वसामान्य माणूस अभिप्रेत आहे. गंगा नदी स्वच्छ राहावी म्हणून आम्ही पूर्वीपासूनच काम करीत आहोत. त्यासाठी आम्ही ‘गंगा वॉरिअर्स’ ही स्थापन केले. पण हे करताना आम्ही सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवले. गंगा शुद्धीकरणादरम्यान सर्वसामान्यांना काय अभिप्रेत आहे? त्यांनी काय करावे, हे उद्देश सांगितले. हे सांगताना आम्ही त्यांना गंगेचे महत्त्वही पटवून दिले.
गंगेची जमीन म्हणजे गंगेचे पात्र तिचेच राहावे यासाठी सर्वप्रथमत: आपण म्हणजे सरकारने काम केले पाहिजे. मुळात गंगेच्या पात्रचीच काळजी घेतली जात नाही हे दुर्दैव आहे. गंगेची जमीन गंगेच्या कामी आली पाहिजे. गंगेच्या पात्रत अनधिकृत बांधकामे होणार नाहीत; यासाठी सर्वप्रथमत: गंगा नदी ज्या-ज्या राज्यांतून वाहते; त्या-त्या राज्यांतील सरकारने पुढाकार घेतला पाहिजे; आणि मग केंद्र सरकारने याकामी त्यांना मदत केली पाहिजे. नुसत्या अनधिकृत बांधकामांवर थांबता कामा नये. गंगा नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून तिला नाल्यांपासून तोडले पाहिजे. म्हणजे नाल्यातील प्रदूषित पाणी तिच्या प्रवाहात सोडता कामा नये. गंगेला अनेक प्रदूषित नाले मिळत आहेत. परिणामी गंगा प्रदूषित होते आहे. म्हणून नाल्यांमधील प्रदूषित पाणी तिच्यामध्ये सोडता कामा नये. रासायनिक कारखान्यांतील रसायनमिश्रित पाणीसुद्धा तिच्यामध्ये सोडता कामा नये. यासाठी केंद्र सरकार जबाबदार असले तरी पहिल्यांदा राज्य सरकार जबाबदार आहे.
आपण केंद्र आणि राज्य सरकार यांना जबाबदार धरताच कामा नये. असे करून आपण आपल्यावरील जबाबदारी झटकतो. केंद्रासह राज्यावर टीका करून आपण आपले हात वर करतो. असे होता कामा नये. गंगा नदी स्वच्छ करायची असेल तर केंद्रासह राज्य सरकार आणि सर्वसामान्य नागरिकांनी याकामी पुढाकार घेतला पाहिजे. गंगेचे संवर्धन करायचे म्हणजे काय करायचे? तिची ओळख पटवून द्यायची म्हणजे काय करायचे? तिचे पंजीकरण करायचे म्हणजे काय करायचे? आणि तिचे सीमांकन करायचे म्हणजे काय करायचे? या सगळ्या गोष्टी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत सर्वसामान्यांना समजावून सांगणो हा गंगा शुद्धीकरणातील पहिला टप्पा आहे. आणि पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला की साहजिकच पुढची प्रक्रिया सहज पार पडते.
दुसरा टप्पा असा की आपण नद्यांचे पाणी अडवून ठेवण्यासाठी नद्यांवर बांध बांधतो. ही गोष्ट चुकीची आहे. नदीला नेहमी वाहते राहू द्या. तिच्या पाण्याचा प्रवाह अडवू नका. नदीचा जो पर्यावरणीय प्रवाह आहे. जो नैसर्गिक प्रवाह आहे. तो कायम राहू द्या. आपण नद्यांचे पाणी अडवून ठेवण्यासाठी नद्यांवर बांध बांधतो. येथेच आपण चुकतो. सर्व नद्यांबाबत हे लागू होते, तेच गंगेबाबतही लागू होते. गंगेचे पाणी अडवून ठेवू नका; असे मी स्वत: कित्येक वर्षापासून सांगतो आहे. पण मी एकटय़ाने सांगून काही होणार नाही. समाजाचे मानसशास्त्र वेगळे असते. समाजाला समाजाची भाषा माहीत असते आणि समजते. समाजाला समाजाच्या भाषेत समजावून सांगितले की ते त्यांना पटते. त्यामुळे गंगेचे नैसर्गिक, पर्यावरणीय स्वरूप कायम ठेवले तर आपण अर्धी लढाई जिंकलेली असेल.
आता तिसरा टप्पा असा की, आपण नद्यांच्या खोलीकरणाच्या आणि रुंदीकरणाच्या भानगडीत पडतो. मुळात असे होताच कामा नये. मी यापूर्वीच म्हटले की नदीचे नैसर्गिक आणि पर्यावरणीय स्वरूप कायम राहू द्या. मुंबईतल्या मिठी नदीबाबत आपण हेच केले. तिच्या खोलीकरणासह तिच्या रुंदीकरणाच्या भानगडीत आपण पडलो. हे साफ चुकीचे आहे. गंगेच्या भोवताली बांधकाम नको. तिच्या पात्रत अडथळे नको. तिच्या खोलीकरणाची भानगड नको. आणि तिच्या रुंदीकरणात आपण पडता कामा नये. असे झाले किंवा असे केले तर आपण नदीच्या मूळ प्रवाहात अडथळा आणतो आणि सर्वस्व गमावून बसतो.
चौथा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा असा की, गंगा नदीला स्वच्छ, सुंदर आणि शुद्ध बनवायचे असेल तर ‘गंगा संरक्षण कायदा’ बनविणो गरजेचे आहे. याचा अर्थ असा नाही की गंगेच्या शुद्धीकरणासाठी इतर प्राधिकरणो नकोत. तीही गरजेची आहेत. कारण गंगा नदीशी संबंधित असलेली प्राधिकरणो त्यांच्या त्यांच्या परीने काम करीत राहतील. पण ‘गंगा संरक्षण कायदा’ मोलाची भूमिका बजावेल. आणि दुसरी गोष्ट ती अशी की; समाजातील संत, वैज्ञानिक आणि विद्यार्थी या तीन घटकांनी गंगेच्या शुद्धीकरणासाठी पुढे आले पाहिजे. वैज्ञानिकांनी त्यांच्या त्यांच्या परीने गंगेला स्वच्छ करण्यासाठी काम केले पाहिजे. विद्याथ्र्यानी याबाबत देश आणि राज्य पातळीवर जनजागृती केली पाहिजे. नुसती जनजागृती करून थांबता कामा नये तर कार्यान्वितही झाले पाहिजे. आणि संतांनी संतांच्या भाषेत सर्वसामान्यांना गंगेचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. हे तीन घटक एकत्र आले तर साहजिकच गंगा सहज शुद्ध आणि स्वच्छ होईल. सरतेशेवटी एवढेच की, गंगेचे पाणी प्रदूषित झाले म्हणून कोणा एकाला जबाबदार धरता कामा नये. गंगा नदी स्वच्छ करण्याची जबाबदारी आपणा सर्वाची आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, वैज्ञानिक, संत, विद्यार्थी आणि समाज असे सर्व घटक एकत्र आले आणि काम सुरू केले तर दहा नाही तर पुढील पाच वर्षात गंगा स्वच्छ आणि शुद्ध होईल.
(लेखक पर्यावरण तज्ज्ञ आहेत.)
(शब्दांकन : सचिन लुंगसे)
 

 

Web Title: ..and clean up in the Ganges during the five years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.