शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...आणि भाजपाचे नेते म्हणाले, ममता बॅनर्जी बनू शकतात पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 10:48 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी देशाच्या पंतप्रधान बनू शकतात, असे भाकित भाजपा नेत्याने केले आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला थेट विरोध करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांनी  राष्ट्रीय राजकारणात प्रमुख स्थान मिळवले आहे ममता बॅनर्जी या देशाच्या पहिल्या बंगाली पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे, असे भाजपाचे पश्चिम बंगालमधील अध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे दिलीप घोष वक्तव्यामुळे भाजपाची नाचक्की

कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला थेट विरोध करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांनी  राष्ट्रीय राजकारणात प्रमुख स्थान मिळवले आहे. सद्यस्थितीत भाजपाचा पराभव होऊन महाआघाडीची सत्ता आल्यास पंतप्रधानदाच्या दावेदार म्हणून ममता बॅनर्जीं यांचेही नाव आघाडीवर असेल. दरम्यान, भाजपाचे पश्चिम बंगालमधील अध्यक्ष दिलीप घोष यांनी ममतांच्या पंतप्रधानपदाबाबत केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. ममता बॅनर्जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ममता बॅनर्जी या देशाच्या पहिल्या बंगाली पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे, असे दिलीप घोष यांनी म्हटले आहे.  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जी यांचा वाढदिवस शनिवार झाला. यावेळी विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यावेळी भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनीही ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या. ''मी ममता बॅनर्जी यांनी उत्तम आरोग्य आणि जीवनात यश मिळो, अशी प्रार्थना करतो. त्यांच्या यशस्वीतेवरच आमच्या राज्याचे भविष्य अवलंबून आहे.  तसेच जर कुठल्या बंगाली व्यक्तीला पंतप्रधान पंतप्रधान बनण्याची संधी असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत. त्यांना चांगले काम करता यावे यासाठी त्या तंदुरुस्त राहाव्यात, अशी आमची इच्छा आहे.'' असे दिलीप घोष म्हणाले.दिलीप घोष यांचे हे वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपाची नाचक्की झाली आहे. ''ज्योती बसू यांच्याकडेही पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती. मात्र त्यांच्या पक्षानेच त्यांना पंतप्रधान होऊ दिले नाही, असेही घोष यावेळी म्हणाले. दरम्यान, घोष यांच्या वक्तव्याचा आधार घेत काँग्रेसने भाजपाला खिंडीत गाठले आहे. आता भाजपाचे नेतेही नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार नाहीत, हे मान्य करू लागले आहेत, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा