अन् बीबीसीने मागितली माफी!

By Admin | Updated: June 4, 2015 04:08 IST2015-06-04T04:08:25+5:302015-06-04T04:08:25+5:30

आपल्या विश्वसनीयतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीला आपल्या उर्दू प्रतिनिधीच्या चुकीमुळे बुधवारी माफीनामा

And the BBC asked for forgiveness! | अन् बीबीसीने मागितली माफी!

अन् बीबीसीने मागितली माफी!

नवी दिल्ली : आपल्या विश्वसनीयतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीला आपल्या उर्दू प्रतिनिधीच्या चुकीमुळे बुधवारी माफीनामा सादर करावा लागला. पत्रकार अहमन ख्वाजा यांनी चुकीने आपल्या टिष्ट्वटर हँडलवरून ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या मृत्यूबाबतचा खोटा संदेश प्रसारित केला. यानंतर सोशल मीडियावर या टिष्ट्वटवरून मोठा वादंग निर्माण झाला.
तथापि, ख्वाजा यांनी आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर तात्काळ हे टिष्ट्वट डिलिट केले. मात्र, तोपर्यंत मोठा वादंग निर्माण झाला होता. खुद्द बीबीसीला यासाठी निवेदन जारी करून खुलासा करावा लागला. दुसरीकडे बकिंगहॅम पॅलेसने महाराणी एलिझाबेथ यांना वार्षिक आरोग्य तपासणीसाठी लंडनच्या किंग एडवर्ड-७ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट करून चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
बीबीसी उर्दूच्या पत्रकार अहमन ख्वाजा यांनी ‘राणी एलिझाबेथ (आजारी) यांचा मृत्यू झाला,’ असे टिष्ट्वट केले होते.
वादानंतर बीबीसीने माफीनामा जारी केला. ‘श्रद्धांजली देण्याच्या तांत्रिक रिहर्सलवेळी एक चुकीचे टिष्ट्वट आमच्या पत्रकाराच्या कार्यालयीन हँडलवरून प्रसारित झाले. आम्ही हा संदेश तात्काळ मागे घेतला असून या चुकीसाठी सर्वांची माफी मागतो,’ असे या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: And the BBC asked for forgiveness!