आनंद महिंद्रा झाले आजोबा, नेटीझन्सनी केली ही मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 02:41 PM2017-11-09T14:41:34+5:302017-11-09T18:08:03+5:30

एका भावनिक ट्विटमधून त्यांनी ही बातमी सर्वांना दिली.

Anand Mahindra became grandfather, netizens demanded scorpio as gift | आनंद महिंद्रा झाले आजोबा, नेटीझन्सनी केली ही मागणी

आनंद महिंद्रा झाले आजोबा, नेटीझन्सनी केली ही मागणी

ठळक मुद्देमहींद्राचे आनंद महींद्रा हे आता आजोबा झाले आहेत.एका ट्विटमधून त्यांनी ही गोड बातमी देशवासीयांना दिली.सर्व त्यांच्या आनंदात सहभागी तर झालेच पण त्यांच्याकडून 'ही' भेटवस्तुही मागली

मुंबई : महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्या घरी बऱ्याच वर्षांनी एका चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. याबाबत त्यांनीच ट्विट करून माहिती दिलीय. त्यांच्या मुलीने एका गोड परीला जन्म दिला आहे. मुलीने दिलेल्या या गोड बातमीमुळे आजोबा फारच खुश दिसताहेत. त्यांनी ही बातमी ट्विट करताच त्यांच्या ग्राहक आणि फॉलोवर्सकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडलाय. तसंच, आता या आनंदात तरी आम्हाला स्कोरपिओ गाडी द्या अशी मागणी नेटीझन्सने केलीय.


भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक म्हणून ओळख असणारे महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आजोबा झाले आहेत. काल-परवापर्यंत आपण केवळ पालक होतो आता आजोबा झालो आहोत आणि या सगळ्या गोष्टी फार चमत्कारीत वाटतात असं त्यांनी ट्विट केलंय. ते ट्विटमध्ये म्हणतात की, 'शनिवारी माझी आणि माझ्या बायकोची सकाळ नेहमी प्रमाणे झाली, पण रविवारची सकाळ उजाडली तेव्हा आम्ही आजी-आजोबा होतो.' त्यावर अनेक नेटिझन्सने त्याचं अभिनंदन करून त्यांच्या आवडत्या कारची मागणी भेटवस्तूंच्या स्वरुपात केली आहे. आम्हाला तुमच्याकडून कोणत्याही पार्टीची अपेक्षा नाही, फक्त तुमच्या प्रसिद्ध गाड्या तुमच्या ग्राहकांना मोफत द्या ए‌वढीच माफक अपेक्षा आहे, अशी गंमतीदार ट्विट करत नेटिझन्सने त्यांचं अभिनंदन केलंय.



महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या अनेक चारचाकी फार प्रसिद्ध आहेत. प्रत्येक कारप्रेमीला त्यांच्या गाड्या आपल्याकडे असाव्यात अशी इच्छा असते. म्हणूनच या गोड दिवशी आनंद महिंद्रा यांच्याकडून गाडी भेटवस्तु मिळावी , अशी मागणी नेटकरी करत होते. 

Web Title: Anand Mahindra became grandfather, netizens demanded scorpio as gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.