शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
4
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
5
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
6
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
7
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
8
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
9
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
10
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
11
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
12
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
13
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
14
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
15
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
16
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
17
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
18
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
19
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
20
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश

Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी नेटीझन्सला विचारला प्रश्न, उत्तर देणाऱ्यास छोटा ट्रॅक्टर गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 10:25 IST

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरुन ट्रॅक्टरचा व्हिडिओ शेअर करत नेटीझन्सना एक ऑफर दिली आहे

महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. विशेष म्हणजे आपल्या ट्विटमध्ये ते युजर्संनाही सहभागी करुन घेत असतात. अनकेदा जुगाडू लोकांचे व्हिडिओ ते शेअर करत त्यांना बंपर ऑफरही देताना दिसून येतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी स्वत:साठी एक नवी कार खरेदी केली. त्यानंतर, ट्विटरवरुन नवीन स्कॉर्पिओ एन कारची चावी घेताना एक फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्यांनी नेटकऱ्यांना, गाडीसाठी चांगले नाव सुचवण्याचे आवाहनही केले होती. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर, महिंद्रा यांनी आता एक ट्रॅक्टरचा व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. 

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरुन ट्रॅक्टरचा व्हिडिओ शेअर करत नेटीझन्सना एक ऑफर दिली आहे. हा ट्रॅक्टर महिंद्राचा आहे हे नक्कीय. पण, कोणत्या देशात हा ट्रॅक्टर आहे? बरोबर उत्तर देणाऱ्या पहिल्या युजर्सला फोटोत दिसत असलेला या ट्रॅक्टरचा स्केल मॉडेल पाठवेन, असेही त्यांनी म्हटलं आहे. महिंद्रा यांनी ट्विट केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून नेटीझन्सनेही कमेंटही केल्या आहेत. त्यामध्ये, ब्राझील, रशिया, जर्मनी, बेल्जीयम या देशांची नावे दिली आहे. त्यामुळे, आता उत्तरादाखल महिंद्रा हे काय ट्विट करतात हे पाहणे आत्सुक्याचे ठरणार आहे. 

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये (Anand Mahindra Twitter Video) अनेक ट्रॅक्टर एका रांगेत उभे असल्याचं दिसतंय. पहिला ट्रॅक्टर ट्रॉली शिलाई मशीन आणि इतर गोष्टींनी सजवण्यात आलंय. कोणा एका कार्यक्रमासाठी ही सजावट केल्याचं समोर आलंय. तसेच ट्रॅक्टरवर एक महिला हसताना दिसतेय. त्याच्या ट्रॉलीवर लाकडी नावाची सजावट करण्यात आली आहे. एक स्त्री आणि एक पुरुष काचेच्या केबिन असलेल्या ट्रॅक्टरजवळ एका रांगेत उभे असल्याचं दिसतात. या ट्रॅक्टरची ट्रॉलीही सजलेली दिसत आहे. तुम्हाला आनंद महिंद्रांच्या प्रश्नाचं उत्तर समजल्यास तुम्हीही टॅक्टर मिळवू शकता. 

स्कॉर्पिओसाठी लाल भीम

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांच्या नवीन स्कॉर्पिओ-एनसाठी अंतिम नाव जाहीर केले. आपल्या स्कॉर्पिओसाठी नवीन नाव मिळाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये कोणतीही स्पर्धा शिल्लक राहिली नव्हती. भीमच विजेता आहे, माझा लाल भीम, नावं सूचवल्याबद्दल धन्यवाद असे ट्वीट त्यांनी केले आहे. 

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया