(निनाद) महिलांनी संधीचे सोने करावे : सुनंदा भोसले

By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:18+5:302015-08-14T22:54:18+5:30

सासवड : 'महिलांना राजकीय क्षेत्रात ५० टक्के आरक्षण शासनाने दिले आहे. या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना विविध मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. मात्र पद मिळाल्यानंतर केवळ कागदोपत्री सही-शिक्क्यांचे मालक होऊन इतरांच्या हस्ते कारभार पाहण्यापेक्षा मिळालेल्या संधीचे सोने करून स्वत:ची ताकद सिद्ध करावी आणि सर्वसामान्य महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा,' असे प्रतिपादन पुरंदरच्या नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील यांनी केले.

(Anaad) Women should make gold of opportunity: Sunanda Bhosale | (निनाद) महिलांनी संधीचे सोने करावे : सुनंदा भोसले

(निनाद) महिलांनी संधीचे सोने करावे : सुनंदा भोसले

सवड : 'महिलांना राजकीय क्षेत्रात ५० टक्के आरक्षण शासनाने दिले आहे. या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना विविध मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. मात्र पद मिळाल्यानंतर केवळ कागदोपत्री सही-शिक्क्यांचे मालक होऊन इतरांच्या हस्ते कारभार पाहण्यापेक्षा मिळालेल्या संधीचे सोने करून स्वत:ची ताकद सिद्ध करावी आणि सर्वसामान्य महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा,' असे प्रतिपादन पुरंदरच्या नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील यांनी केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील सावित्री महिला पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या वेळी नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील यांच्या हस्ते सर्व महिला संचालकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी त्या बोतल होत्या.
या प्रसंगी पतसंस्थेच्या अध्यक्षा वैशाली जगताप, उपाध्यक्षा रंजना भिंताडे, सचिव मीनाक्षी जाधव, संचालिका सुचेता भोंगळे, मनीषा ताकवले, साबिला तांबोळी, संगीता ताकवले, मंगल म्हेत्रे, वैशाली सचिन जगताप, अपर्णा पुरंदरे, नीता भालेराव, सुषमा बोरकर, प्रतिमा किकले, तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे उपप्राचार्य बोडके, महाराष्ट्र राज्य विशेष वसुली अधिकारी जावीर तसेच पतसंस्थेच्या व्यवस्थापिका, कर्मचारी, दैनंदिनी प्रतिनिधी उपस्थित होते.
भोसले पाटील म्हणाल्या, की महिलांच्या गरजा ओळखून त्यांना मदतीचा हात द्यावा. दैनंदिन बचत करण्यास प्रवृत्त करून त्या बचतीचा चांगला उपयोग करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावे.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे उपप्राचार्य बोडके यांनी सर्व संचालक आणि व्यवस्थापक व कर्मचारी यांना पतसंस्था कशी चालवावी याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कैलास पिसे यांनी केले तर आभार सचिव मीनाक्षी जाधव यांनी मानले.
.................................................. ..................................................
फोटो ओळ : सावित्री महिला पतसंस्थेच्या वार्षिक सभेचे उद्घाटन नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: (Anaad) Women should make gold of opportunity: Sunanda Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.