शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या कुत्र्याचा मृत्यू अन् एकुलत्या एक मुलीने संपवलं जीवन; आईच्या आरोपाने माजली खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 15:16 IST

छत्तीसगडमधील कोरबा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोरबा : छत्तीसगडमधील कोरबा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका विद्यार्थिनीला तिच्या पाळीव कुत्र्याच्या मृत्यूचा धक्का बसला आणि तिने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. इरिगेशन कॉलनी रामपूर येथे राहणाऱ्या रिचा सोंढिया या तरुणीने आपले आत्महत्या केली. रिचाचे तिच्या पाळीव कुत्र्यावर खूप प्रेम होते, परंतु काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून ती डिप्रेशनमध्ये गेली होती. अशा परिस्थितीत तिने हे आत्महत्येचे पाऊल उचलले.

दरम्यान, रायपूरमध्ये राहणाऱ्या आणि डीसीएचे शिक्षण घेत असलेल्या रिचा सोंढियाने तिचा मित्र अनिकेत मिश्रासोबत 40,000 रुपयांना महागड्या जातीच्या कुत्र्याची खरेदी केली होती असे सांगितले जात आहे. रिचा तिच्या लाडक्या कुत्र्याचा खूप लाड करत असे. ती नेहमी त्याच्यासोबत असायची. अलीकडेच या कुत्र्याची प्रकृती खालावली आणि काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. आपल्या लाडक्या डॉगीच्या मृत्यूने रिचा पूर्णपणे तुटली होती. ती सतत रडायची, त्यानंतर नैराश्यात तिने मृत्यूला कवटाळले. 

एकुलत्या एक मुलीचा मृत्यूमृत तरूणीची आई महसूल विभागात शिपाई म्हणून काम करते. पती गेल्यानंतर तिचा एकमेव आधार तिची मुलगी होती, पण तिनेही तिच्या आईला एकटे सोडून आत्महत्या केली. फासावर लटकलेल्या अवस्थेत रिचाला पाहताच तिला एनकेएच रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सध्या पोलिसांनी पंचनामा करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

तरूणीच्या आईचा गंभीर आरोप रिचाची आई तिच्या मुलीच्या मृत्यूसाठी तिच्यासह अनिकेत मिश्राला जबाबदार धरत आहे. अनिकेतने रिचाला पैशांसाठी त्रास दिला नसता तर कदाचित तिचा जीव वाचला असता, असे तिचे म्हणणे आहे. आता त्या तरुणावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी मृत रिचाच्या आईने केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूdogकुत्रा