शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:44 IST

सुरक्षेला प्राधान्य देत पायलटने तात्काळ हे विमान रनवेवरून पुन्हा पार्किंगच्या परिसरात आणले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवण्यात आले

चंदीगड - अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अनेकांच्या मनात विमान प्रवासाबद्दल धडकी भरली आहे. अलीकडेच चंदीगडच्या शहीद भगत सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना टळली. याठिकाणी लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात टेकऑफ होण्याआधीच तांत्रिक बिघाड लक्षात आला. पायलटच्या सतर्कतेमुळे विमान उड्डाण वेळीच रोखले आणि विमानातील १७७ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बोर्डिंगनंतर विमानाचे उड्डाण रद्द केल्याने प्रवाशांमध्ये मोठी नाराजी पसरल्याचे दिसून आले. 

जवळपास १ तास विमान उड्डाण खोळंबले तरीही प्रवाशांना योग्य ती माहिती दिली नाही. ही फ्लाईट सकाळी 7.10 मिनिटांनी रवाना होणार होती. सर्व प्रवासी बोर्डिंग करून विमानात बसले होते. विमान हळूहळू पार्किंग एरियातून रनवेच्या दिशेने जात होते तेव्हा पायलटला विमानातील तांत्रिक बिघाड लक्षात आला. सुरक्षेला प्राधान्य देत पायलटने तात्काळ हे विमान रनवेवरून पुन्हा पार्किंगच्या परिसरात आणले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर फ्लाईट अचानक रद्द करण्यात आली. प्रवाशांनाही १ तास कुठलीही माहिती न दिल्याने विमानतळावरच गोंधळ उडाला. 

या प्रकारामुळे लहान मुले, वृद्ध प्रवासी, महिला त्रस्त असल्याचे दिसून आले. काही प्रवासी जमिनीवर बसूनच पुढच्या सूचनेची वाट पाहत होते. एका प्रवाशाने सोशल मीडियावर त्याची व्यथा मांडत पंतप्रधान कार्यालयाकडे मदतीची मागणी केली. बोर्डिंग झाल्यानंतर विमानाचे उड्डाण रद्द होणे हे केवळ गैरसोयीचेच नाही तर मानसिक ताण देखील वाढवते. बोर्डिंगनंतर उड्डाण रद्द केले परंतु कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने समोर येऊन वस्तूस्थितीची माहिती दिली नाही. १ तासाहून अधिक वेळ झाला तरीही कुणी काही सांगण्यास तयार नाही असं प्रवाशाने सांगितले. 

दरम्यान, फ्लाईट रद्द झाल्यानंतर इंडिगोने प्रवाशांना अन्य विमान सेवेचा पर्याय दिला. ज्या प्रवाशांना पुन्हा प्रवास करायचा नाही त्यांना पूर्ण रिफंड देण्याचाही पर्याय दिला. काही प्रवाशांना दिल्लीतून लखनौला जाणारी कनेक्टिंग फ्लाईटची सुविधा दिली. काही प्रवाशांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दुसरीकडे लखनौ येथील चौधरी शरण सिंह एअरपोर्टहून दिल्लीला येणाऱ्या जाणाऱ्या २५ फ्लाईट एअर इंडियाने रद्द केल्या. २१ जून ते १५ जुलैपर्यंत या फ्लाईट रद्द आहेत. 

टॅग्स :IndigoइंडिगोAir Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटना