शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! "मी तुझ्या पतीला देवाकड पाठवलं", भारतीय जवानाची हत्या करून आरोपीचा पत्नीला मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 21:53 IST

हरयाणातील अंबाला येथे भारतीय जवानाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली.

कानपूर : हरयाणातील अंबाला येथे भारतीय जवानाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. पवन या जवानाच्या हत्येनंतर जवानाचे पार्थिव उत्तर प्रदेशातील कानपूर येथे त्याच्या मूळ गावी आणण्यात आले. कानपूर जिल्ह्यातील कैलाई या मूळ गावी शनिवारी पार्थिव दाखल झाले. जवानाच्या अंतिम दर्शनासाठी संपूर्ण गाव जमले होते. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने वडिलांनी एकच टाहो फोडला. पतीच्या पार्थिवासोबत सासरच्या घरी पोहचलेली पत्नी रागिणी कुटुंबीयांना भेटताच बेशुद्ध पडली. माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, असे ती सातत्याने म्हणत होती. 

दरम्यान, कुमाऊ रेजिमेंटचे जवान कानपूर कॅन्ट येथून जवानाला अखेरची सलामी देण्यासाठी दाखल झाले. अंत्यसंस्कार करण्याऐवजी समाधी बांधण्यासाठी जमिनीची मागणी ग्रामस्थांनी केली. प्रशासनाने ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती, त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला आहे. मग अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर विषय मार्गी लागला. 

एका मेसेजने खळबळ उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी असलेले जवान पवन यांचा मृतदेह अंबाला येथे रेल्वे रुळावर आढळून आला. त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामागचे कारण म्हणजे त्यांच्या पत्नीला व्हॉट्सपवर आलेला मेसेज. "मी तुझ्या पतीला देवाकडे पाठवले आहे, पाकिस्तान जिंदाबाद", अशा आशयाचा मेसेज जवानाच्या पत्नीला अज्ञाताने केला. 

भारतीय जवानाची हत्याखरं तर अंबाला येथे सैन्याच्या ४० एडी एसआर युनिटमध्ये ३ वर्षांपासून तैनात असलेले जवान पवन त्याची पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी पवन शंकर मंदिरात जात असल्याचे सांगून घरातून निघाले. यानंतर ते परतलेच नाहीत. रात्री उशिरापर्यंत पत्नीने त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन बंद असल्याचे आढळले. अखेर पवन यांच्या मोबाईलवरूनच व्हॉट्सपवर मेसेज आल्याने एकच खळबळ माजली. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशHaryanaहरयाणाIndian Armyभारतीय जवानDeathमृत्यू