शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

डिटोनेटरचा स्फोट करून रेल्वेपूल उडविण्याचा राजस्थानात प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 08:09 IST

उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेला पूल अज्ञात व्यक्तींनी डिटोनेटरच्या स्फोटाद्वारे उडवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

उदयपूर : उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेला पूल अज्ञात व्यक्तींनी डिटोनेटरच्या स्फोटाद्वारे उडवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. हा प्रकार शनिवारी रात्री घडला. या स्फोटामुळे रुळांना तडे गेले आहेत. हा घातपाती प्रकार घडण्याच्या चार तास आधी त्या पुलावरून एक रेल्वेगाडी रवाना झाली होती. मीटरगेज असलेल्या उदयपूर-अहमदाबाद रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर केले होते. त्या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ मे रोजी उद्घाटन केले होते. यामागे दहशतवाद्यांचा हात आहे का हे शोधण्याच्या दिशेनेही तपास करीत आहेत.उदयपूरचे जिल्हाधिकारी ताराचंद मीणा म्हणाले की, डिटोनेटर्सने पूल उडविण्याचा कट समोर आला आहे. उदयपूरचे पोलिस अधीक्षक विकास शर्मा यांनी सांगितले की, पूर्वनियोजित कटानुसार हा स्फोट घडविण्यात आल्याचे दिसून येते. त्यासाठी वापरलेला डिटोनेटर सुपर ९० श्रेणीतील आहे. (वृत्तसंस्था)

...तर अनेकांचा प्राण गेला असताn उदयपूरपासून ३५ किमी अंतरावर सलुंबर येथील केवडे ओढा रेल्वे पुलावर शनिवारी रात्री दहाच्या सुमारास गावकऱ्यांना स्फोटाचा आवाज आला. n यानंतर काही तरुण तातडीने ट्रॅकवर पोहोचले. रेल्वे रुळावर त्यांना दारूगोळा तसेच अनेक ठिकाणी रूळ तुटल्याचे दिसले. तसेच पुलावरील नट-बोल्टही गायब असल्याचे आढळून आले. यानंतर ग्रामस्थांनी तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली. यानंतर ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली. त्या रुळावर ट्रेन आली असती तर अनेकांचा जीव धोक्यात आला असता.

गाड्या थांबविल्यापुलावर स्फोट झाल्याचे लक्षात येताच त्यानंतर अहमदाबादहून उदयपूरला जाणारी रेल्वेगाडी डुंगरपूर येथे थांबविण्यात आली. तशीच दक्षता या मार्गावरून जाणाऱ्या अन्य रेल्वेगाड्यांबाबत घेण्यात आली.डिटोनेटरचा शक्तिशाली स्फोट होऊन रेल्वे रूळ उद्ध्वस्त झाले असते व पूल उडविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर त्याचा गुजरात, इतर राज्यांच्या रेल्वे वाहतुकीवर आणखी विपरित परिणाम झाला असता. ३५ मीटर उंचीचा पूल सलंबुर मार्गावर बांधलेला रेल्वेपूल सुमारे ३५ मीटर उंच, ४ मीटर रुंद असून त्याची लांबी ४५.७ मीटर आहे. २०१७ रोजी हा पूल बांधण्यास सुरुवात झाली होती. उदयपूर-अहमदाबाद मीटर गेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले. याच रेल्वेमार्गावर उदयपूर-अहमदाबाद दरम्यान सुरू केलेल्या नव्या रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असारवा रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखविला होता. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानrailwayरेल्वे