शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात मोदी सरकारची एक घोषणा, चीनचं टेन्शन वाढणार...! भारताला होऊ शकतो मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 15:42 IST

अर्थसंकल्प 2024 वरून विरोधी पक्ष सरकार विरोधात आक्रमक आहे. मात्र, या अर्थसंकल्पात भारत सरकारने एक अशी घोषणा केली आहे, ज्यामुळे चीनचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

देशातील नरेंद्र मोदी सरकारने अपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प 2024 वरून विरोधी पक्ष सरकार विरोधात आक्रमक आहे. मात्र, या अर्थसंकल्पात भारत सरकारने एक अशी घोषणा केली आहे, ज्यामुळे चीनचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. सरकारने अर्थसंकल्पात कॉरपोरेट टॅक्स कमी करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जगभरातील कंपन्यांसाठी भारत चीनचा एक मोठा पर्याय म्हणून समोर येऊ शकतो. 

चीनला बसेल झटका...!  केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात परदेशी कंपन्यांचा कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकप्लीय भाषणादरम्यान म्हणाल्या, देशाच्या आवश्यकतेनुसार, परदेशी भांडवल आकर्षित करण्यासाठी परदेशी कंपन्यांवरील कॉर्पोरेट टॅक्स 40 टक्क्यांवरून 35 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव ठेवला जात आहे. सरकारच्या या निर्णयाकडे एक स्ट्रॅटिजिक पाऊल म्हणून बघितले जात आहे. हा निर्णय परदेशी कंपन्यांना भारताकडे आकर्षित करेल. तसेच भारताला चीनचा पर्याय बनण्यासही मदत करेल.

का वाढू शकतं चीनचं टेन्शन - अर्थसंकल्पात परदेशी कंपन्यांच्या कॉर्पोरेट टॅक्ससंदर्भात घेण्यात आलेला निर्णय चीनचे टेन्शन वाढवू शकतो. सरकारच्या या निर्णयामुळे परदेशी कंपन्या भारतात आपली गुंतवणूक वाढवू शकतात. या कंपन्यांसाठी भारत चीनचा एक उत्तम पर्याय ठरू शखतो. चीनच्या अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थिती पाहता परदेशी कंपन्या आधीच धास्तावलेल्या आहेत. यातच चीन सरकारचा व्यवसायातील हस्तक्षेप, यामुळे कंपन्यां त्रस्त आहेत. अशा स्थितीत भारत सरकारच्या या निर्णयामुळे चीनमधील परदेशी गुंतवणुकीला आणखी आव्हान मिळेल. तसेच या निर्णयामुळे भारतही परदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरू शकतो.

यामुळे ग्लोबल सप्लाय चेन चीनवरून शिफ्ट होऊन भारताला जोडली जाऊ शकते. जर असे घडले तर चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसेल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीXi Jinpingशी जिनपिंगBudgetअर्थसंकल्प 2024