शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! मुलीला बक्षिस अन् वडिलांचा मृत्यू; गुजरातमध्ये रक्तरंजित 'गरबा', सात नराधम ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 17:06 IST

११ वर्षीय मुलीने 'बेस्ट गरबा'चा पुरस्कार पटकावला पण आपल्या वडिलांना गमावले.

गरबा खेळून बक्षिस जिंकणाऱ्या मुलीच्या डोक्यावर काही क्षणातच दु:खाचा डोंगर कोसळला. ११ वर्षीय मुलीने 'बेस्ट गरबा'चा पुरस्कार पटकावला पण आपल्या वडिलांना गमावले. खरं तर आयोजकांनी तिच्या वडिलांना मारहाण करून त्यांची हत्या केली. गुजरातच्या पोरबंदर येथे ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. बक्षिस विजेत्या मुलीच्या आईने आयोजकांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीने स्पर्धेत विजय मिळवून देखील तिला बक्षिस मिळाले नाही. यानंतर वाद चिघळला अन् आयोजकांनी मुलीच्या वडिलांना संपवले. 

पोलिस उपअधीक्षक रूतू राबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सरमन ओडेदरा यांच्यावर पोरबंदर येथील कृष्णा सोसायटीजवळ मंगळवारी रात्री सात जणांनी जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या या हल्ल्यात सरमन ओडेदरा यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येत सहभागी असलेल्या सातही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. राजा कुचडिया, राजू केशवाला, रामदे बोखिरिया, प्रतिक गोरानिया आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे. 

गुजरातमध्ये रक्तरंजित 'गरबा'पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरोपींनी कृष्णा पार्कमध्ये गरबा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिथे जवळच ओडेदरा कुटुंबीय राहतात. ओडेदरा यांच्या पत्नीने सांगितले की, त्यांची मुलगी गरबा खेळून घरी आली पण तिने स्पर्धा जिंकूनही बक्षिस न मिळाल्याचे सांगितले. लेकीच्या सांगण्यावरून सरमन ओडेदरांची पत्नी मालीबेन हिने आयोजकांकडे धाव घेतली अन् वाद चिघळला. त्यांनी घरी जाण्यास सांगितले याशिवाय तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी शिवीगाळ केल्यानंतर मालीबेन या मुलीला घेऊन घरी परतल्या.

सात नराधम ताब्यात मालीबेन घरी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि चार मुख्य आरोपींनी ओडेदरा यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. मालीबेन यांना देखील मारहाण करण्यात आली. यानंतर आरोपींनी हद्दच केली अन् मुलीच्या वडिलांना गरबा सुरू असलेल्या ठिकाणी नेले आणि पोलीस येईपर्यंत बेदम मारहाण केली, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सरमन ओडेदरा यांना इस्पितळात नेले. पण दुर्दैवाने ओडेदरा यांचा आधीच मृत्यू झाला होता. 

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारीNavratriनवरात्रीDandiaदांडिया