शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हर गाव का मनोहर; अमूल्य व्यक्तिमत्त्वाला अमूलची श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 09:53 IST

मनोहर पर्रिकरांनी पणजीत रविवारी अखेरचा श्वास घेतला

नवी दिल्ली: गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना अमूलनं श्रद्धांजली वाहिली आहे. पर्रिकर यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो वापरुन अमूलनं त्यांना आदरांजली वाहिली. 'हर गाव का मनोहर' असं शीर्षक या फोटोला देण्यात आलं आहे. 'आदरणीय राजकारणी आणि नेत्याला सलाम', अशा शब्दांमध्ये अमूलनं पर्रिकरांना श्रद्धांजली अर्पित केली. रविवारी (17 मार्च) पर्रिकर यांनी पणजीत अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून ते स्वादुपिंडाच्या कर्करोगानं ग्रस्त होते. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. तीनवेळा गोव्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या पर्रिकर यांच्या निधनाबद्दल सर्वांनीच शोक व्यक्त केला. अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या पर्रिकरांच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पर्रिकर यांनी संरक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. पर्रिकर यांच्या निधनानंतर मोदींनी ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. 'मनोहर पर्रीकर अतुलनीय नेते होते. ते एक सच्चे देशभक्त आणि उत्तम प्रशासक होते. ते कायमच सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांनी केलेली देशाची सेवा येणाऱ्या अनेक पिढ्या विसरणार नाहीत. त्यांच्या निधनानं अतिशय दु:ख झालं आहे. त्यांच्या कुटुंबाच्या आणि समर्थकांच्या दु:खात सहभागी आहे. ओम शांती,' अशा शब्दांमध्ये मोदींनी ट्विटरवर पर्रिकरांना आदरांजली वाहिली होती. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरNarendra Modiनरेंद्र मोदी