शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

#AmritsarTrainAccident : ... तर दुर्घटना टळली असती; रेल्वे प्रशासनाने केले हात वर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 09:45 IST

Amritsar Rail Accident: आयोजित कार्यक्रमाबाबत कोणतीही सूचना देण्यात आली. त्यामुळे स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून कुठलाही सर्तकतेचा आदेश जारी करण्यात आला नव्हता. आधीच सूचना मिळाली असती तर ट्रेनचा वेग कमी ठेवता आला असता. 

अमृतसर : रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61हून अधिक जण ठार, तर 72 जण जखमी झाले आहेत. रेल्वेचा वेग व उपस्थितांची संख्या बघता, मृतांची संख्या 100वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, या दुघटनेबाबात रेल्वे प्रशासनाकडून हात झटकण्यात आले आहेत. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी रात्रीच घटनास्थळी पोहोचून या दुर्घटनेबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर मनोज सिन्हा यांनी सांगितले की, उत्तर रेल्वेच्या फिरोझपूर विभागामध्ये हा भीषण अपघात घडला. आयोजित कार्यक्रमाबाबत कोणतीही सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून कुठलाही सर्तकतेचा आदेश जारी करण्यात आला नव्हता. आधीच सूचना मिळाली असती तर ट्रेनचा वेग कमी ठेवता आला असता. 

रावणदहन पाहाण्यासाठी हजारो लोक याठिकाणी जमले होते. रावणदहनावेळी फटाके फुटू लागल्याने त्यापासून लोक दूर जाऊ लागले. त्यातील 300 हून अधिक जण बंद असलेल्या फाटकाजवळील रेल्वे रुळांत जाऊन उभे राहिले. ते सारे जण हा सोहळा पाहाण्यात व त्याचे मोबाइलवर चित्रीकरण करण्यात इतके मश्गुल होते की, फटाक्यांच्या धूमधडाक्यात समोरून ट्रेन येत असल्याचे भानही त्यांना राहिले नाही. एकाच वेळी जालंधरहून अमृतसरकडे एक ट्रेन येत होती तर तेथूनच हावडा मेल जात होती. काही कळायच्या आतच ट्रेन अनेकांना चिरडून पुढे निघून गेली. ज्यांनी एका ट्रेनपासून वाचण्याचा प्रयत्न केला, ते दुस-या ट्रेनखाली आले. थरकाप उडविणा-या या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्यास तिथे हजर असलेल्यांपैकीच अनेक जण पुढे सरसावले. जखमींना जवळच्याच इस्पितळात दाखल करण्यात आले.

 

जीव वाचविण्याची संधी मिळाली नाहीजालंधरहून अमृतसरकडे ट्रेन येत असतानाच विरुद्ध दिशेनेही दुसरी ट्रेन आली. त्यामुळे रुळांवर उभे असलेल्या बेसावध लोकांना आपला जीव वाचविण्याकरिता धावपळ करायची उसंतही मिळाली नाही.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीरअपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अरमिंदर सिंग यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींवर मोफत उपचार केले जातील. या अपघाताची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्री सिंग यांनी दिले आहेत.

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटनाrailwayरेल्वे