खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगच्या आईला अटक, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 09:44 AM2024-04-08T09:44:08+5:302024-04-08T09:45:01+5:30

Amritpal Singh's mother arrested : 'चेतना मार्च'च्या एक दिवस आधी पोलिसांनी बलविंदर कौर यांना अटक केली आहे.

Amritpal Singh's mother, uncle arrested day before proposed march seeking his shifting from Assam to Punjab | खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगच्या आईला अटक, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगच्या आईला अटक, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

पंजाब : खलिस्तानी समर्थक आणि 'वारीस पंजाब दे'संघटनेटचा प्रमुख अमृतपाल सिंगची आई बलविंदर कौर यांना अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 'चेतना मार्च'च्या एक दिवस आधी पोलिसांनी बलविंदर कौर यांना अटक केली आहे. दरम्यान, अमृतपाल सिंगची आई बलविंदर कौर आज 'चेतना मार्च' काढणार होत्या. याआधी त्यांना अमृतसरमध्ये अटक करून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला.

बलविंदर कौर आपला मुलगा अमृतपाल सिंग याला आसाम तुरुंगातून पंजाबच्या तुरुंगात हलवण्याच्या मागणीसाठी 'चेतना मार्च' काढणार होत्या. रविवारी संध्याकाळी पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या आईला अटक केली. यासोबतच पोलिसांनी बलविंदर कौर, सुखचैन सिंग आणि इतर तिघांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून बलविंदर कौरला अटक करण्यात आली आहे. बलविंदर कौर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये खलिस्तानी फुटीरतावादी नेता अमृतपाल सिंग याला अटक करण्यात आली होती. अमृतपाल सिंग आणि त्याचे नऊ साथीदार सध्या आसाममधील दिब्रुगड तुरुंगात आहेत. गेल्या वर्षी अमृतपाल सिंग आणि त्यांच्या काही समर्थकांनी पंजाबमधील अजनाला पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. अमृतपाल सिंगचा समर्थक लवप्रीतच्या सुटकेच्या मागणीवरून पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी अमृतपाल सिंगला अटक केली. अटकेनंतर त्याची रवानगी आसाममधील दिब्रुगड तुरुंगात करण्यात आली आहे.

Web Title: Amritpal Singh's mother, uncle arrested day before proposed march seeking his shifting from Assam to Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.