शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

अमृतपाल दुचाकीवरून पळाला; वेश बदलला, दाढीही कमी केली, पत्नी किरणदीप बब्बर खालसाची सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 06:56 IST

जालंधरपासून जवळपास ४५ किमी अंतरावर दारापूरमध्ये ही दुचाकी सापडली. दरम्यान, अमृतपालने वेश बदलला असून, दाढी कमी केली आहे. 

अमृतसर : ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंगच्या शोधासाठी पाचव्या दिवशीही ऑपरेशन सुरू आहे. ज्या दुचाकीवरून तो पळून गेला ती दुचाकी पोलिसांनी बुधवारी जप्त केली. जालंधरपासून जवळपास ४५ किमी अंतरावर दारापूरमध्ये ही दुचाकी सापडली. दरम्यान, अमृतपालने वेश बदलला असून, दाढी कमी केली आहे. 

एनआयएची आठ पथके दाखल पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या ४५८ जवळच्या साथीदारांची ओळख निश्चित केली असून, त्यांची यादी एनआयएकडे सोपवली आहे. या लोकांची ए, बी आणि सी श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे. ए श्रेणीत १४२ लोक आहेत. जे २४ तास अमृतपालसोबत असतात. बी श्रेणीत २१३ लोक आहेत. जे वित्त आणि संस्थेचे काम पाहतात. एनआयएची आठ पथके पंजाबमध्ये पोहोचली असून, या पथकांनी अमृतसर, तरणतारण, जालंधर, गुरुदासपूर, जालंधर जिल्ह्यात तपास सुरू केला आहे.

स्थगन प्रस्ताव फेटाळलापंजाब विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेबाबतचा काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव फेटाळण्यात आला. तर, अमृतपाल सिंग याच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्याने शिरोमणी अकाली दलाने टीका केली. त्यामुळे सभागृहात बुधवारी मोठा गदारोळ झाला. पंजाब सरकारने मंगळवारी तरन मारन, फिरोजपूर, मोगा, संगरूर, अमृतसरच्या अजनाळा आणि मोहल्लाच्या काही भागात मोबाइल इंटरनेट आणि एसएसएम सेवांवरील बंदी गुरुवारी दुपारपर्यंत वाढविली आहे.

पत्नीवर खलिस्तानी चळवळीस मदतीचा आरोपपोलिसांनी अमृतपालच्या आईची दुपारी अमृतसरच्या जल्लूपूर खेडा गावात तासभर चौकशी केली. अमृतपालची पत्नी किरणदीप कौर हिचीही चौकशी केली. किरणदीप कौर ही एनआरआय आहे. ती बब्बर खालसाची सक्रिय सदस्य आहे. ती बब्बर खालसासाठी निधी जमा करते, असे समजते. याच कारणास्तव तिला आणि आणखी पाच जणांना २०२० मध्ये अटक झाली होती. तिच्यावर ब्रिटनमधून खलिस्तान चळवळीला आर्थिक मदत करण्याचा आरोप आहे.

अंतिम लोकेशन फिरोजपूर-मोगा राेडअमृतपाल सिंग याचे शेवटचे लोकेशन फिरोजपूर-मोगा रोडच्या दिशेने आहे. तिथे सीसीटीव्हीमध्ये तो शेवटचा दिसला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो फिरोजपूरकडे वळल्याचे दिसत आहे. नंगल अंबिया गावातून हा रस्ता फिरोजपूर आणि मोगा या दोन्ही मार्गांना जोडतो. अमृतपाल बठिंडा किंवा राजस्थानलाही जाऊ शकतो.

नेमके काय घडले? अमृतपालचे एक छायाचित्र समोर आले आहे. ज्यामध्ये त्याने वेश बदलला आहे. त्याने दाढी कमी केली आहे. पगडी परिधान केलेली आहे. तो शर्ट आणि जिन्समध्ये दुचाकीवर बसलेला दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल ब्रेझा कारमधून नंगल अंबिया गावात पोहोचला होता. येथे गुरुद्वारात त्याने पोशाख बदलला. यानंतर तो दुचाकीवर पळून गेला. पोलिसांनी मनप्रीत मन्नाच्या शाहकोट येथील घरातून ब्रेझा कार जप्त केली. मन्ना हा अमृतपालचा माध्यम सल्लागार असल्याचे सांगितले जाते. याशिवाय गुरदीप दीपा, हरप्रीत हॅप्पी आणि गुरभेज भेज्जा यांनाही अटक केली आहे. 

शस्त्राच्या धाकावर एक तास बंदी ग्रंथीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमृतपालविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. ग्रंथींनी सांगितले की, आपल्या मुलाला पाहण्यासाठी मुलीकडील लोक येणार होते. आम्हाला वाटले की, अमृतपाल हा मुलीकडील व्यक्ती आहे. आम्ही त्याला आत बोलावले. ग्रंथींची पत्नी नरिंदर कौर यांनी सांगितले की, शस्त्राच्या धाकावर एक तास बंदी बनविले. त्यांच्याकडे पिस्तूल, रायफल, तलवारीही होत्या. अमृतपाल फोनवर कुणाला तरी कॉल करत होता. 

टॅग्स :Punjabपंजाब