भारतीय रेल्वेमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्या जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण जेव्हा देशातील लग्झरी ट्रेनमध्येही असंच घडत आहे, तेव्हा काय करायचं असा प्रश्न पडतो. अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या पॅकेटचे फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये टाकून दिलेल्या डिस्पोजेबल प्लेट्स आणि उरलेलं अन्न दिसत आहेत. प्रवाशांचा दावा आहे की, त्यांना पुन्हा वापरल्या जाणाऱ्या प्लेट्सवर जेवण देण्यात आलं होतं. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसोबत किळसवाणा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.
ट्रेनमध्ये जेवण देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल प्लेट्स आणि बॉक्स धुऊन पुन्हा वापरल्या जात आहेत. प्रवाशांचं म्हणणं आहे की, त्यांना जुन्या पदार्थांचे आणि तेलाचे डाग असलेल्या बॉक्समध्ये जेवण देण्यात आलं होतं. कोणीतरी याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, जे आता वेगाने व्हायरल होत आहेत. काही युजर्सनी यावर टीका करत लिहिलं की, रेल्वेने आता शाश्वत विकासात पुढाकार घेतला आहे, कारण प्लेट्स आता फेकल्या जात नाहीत तर धुतल्या जातात आणि पुन्हा वापरल्या जातात. प्रकरण वाढताच, रेल्वेने केटरिंग एजन्सीकडून रिपोर्ट मागवला आणि चौकशी सुरू केली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील @ImYadavVinay नावाच्या अकाउंटवरून शेअर केलेले हे फोटो अनेकांनी पाहिले आहेत. रेल्वेने सार्वजनिक आरोग्याशी तडजोड केल्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने टीका केली, "हे पाहिल्यानंतर, मला असं वाटतं की मी ट्रेनमध्ये काहीही ऑर्डर करू नये" असं म्हटलं. तर दुसऱ्याने "डिस्पोजेबल प्लेट्स धुणं आणि पुन्हा वापरणं हे स्वच्छतेच्या नियमांचं उघड उल्लंघन आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणं सहन केलं जाऊ नये" असं म्हटलं.
Web Summary : Amrit Bharat Express faces criticism after disposable plates were allegedly washed and reused for serving food. Passengers reported receiving meals in stained boxes, raising hygiene concerns. Railway officials have launched an investigation and sought a report from the catering agency following widespread outrage on social media.
Web Summary : अमृत भारत एक्सप्रेस में डिस्पोजेबल प्लेटों को धोकर फिर से इस्तेमाल करने का आरोप है. यात्रियों ने दागदार बक्सों में भोजन मिलने की शिकायत की, जिससे स्वच्छता पर सवाल उठे. सोशल मीडिया पर आक्रोश के बाद रेलवे ने जांच शुरू की और कैटरिंग एजेंसी से रिपोर्ट मांगी है.