शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा भाजपच्या वाटेवर? अमित शहा यांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 04:17 IST

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राणा यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.

नवी दिल्ली  - अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राणा यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.खासदार नवनीत राणा यांच्याशी संपर्क साधला असता अमरावतीतील विकासकामांच्या मुद्यावर अमित शहा यांची भेट घेतल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र, त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी एका वृत्तसंस्थेला ‘बदल होत असतात’ अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यामुळे या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना पराभूत केले होते. त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढविली होती आणि काँग्रेस व राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला होता.महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना नवनीत राणा व रवी राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविणारे ठरू शकेल. महाराष्ट्रात काँग्रेसचा एक, तर राष्ट्रवादीचे चार खासदार आहेत. राणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास विरोधी पक्षाची ताकद कमी होईल.राजकीय हेतू नव्हताअमित शहा यांची भेट घेण्यात राजकीय हेतू नव्हता. अमरावतीचा विकास या एकमेव मुद्यावर आमची चर्चा झाली. - खासदार नवनीत राणा

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण