शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' संकटांनं केलं भीषण स्वरूप धारण, मोदी अन् शहांनी घेतला परिस्थितीचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 13:02 IST

पंतप्रधानांनी आपत्ती निवारण प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) केलेल्या तयारीचा, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.

नवी दिल्लीः  'अम्फान' चक्रीवादळाचं एका सुपर चक्रीवादळात रुपांतर झाल्यानं धोका वाढला आहे. 20 मे रोजी हे चक्रीवादळ तीव्र वेगानं पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकू शकते. यामुळे ओडिशातील किनारपट्टी व पश्चिम बंगालच्या गंगानदीजवळील भागात जोरदार वा-यांसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 'अम्फान'मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेतली. पीएमओने निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी आपत्ती निवारण प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) केलेल्या तयारीचा, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.गृहराज्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) च्या अधिका-यांसमवेत पंतप्रधानांची काल बैठक झाली. एक तासापेक्षा जास्त काळ ही बैठक चालली. त्यात गृहमंत्री अमित शहा हेदेखील उपस्थित होते. त्यातील वाऱ्याचा वेग ताशी २३० किमीपर्यंत वाढला आहे. दरम्यान, मान्सूनची वाटचाल सुरू असून सोमवारी मान्सूनने निकोबार बेटे व्यापली आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाचे रुपांतर सोमवारी दुपारी सुपर चक्रीवादळात झाले. यावेळी त्याचा जोर कमी होऊन तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालेले असेल. यावेळी किनारपट्टीवर ताशी ८० ते ९० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात पुणे आणि परभणी येथे पूर्व मोसमी पाऊस झाला. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. वेगाने हे चक्रीवादळ किनारपट्टीच्या दिशेने उत्तरेला पुढे येत आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीमपर्यंत जोरदार पावसाची शक्यता असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चीनच्या दबावाखाली येत नेपाळनं बनवला नकाशा अन् भारताच्या भागावर दाखवला 'कब्जा'

जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय; ढवळाढवळ करणार नाही, तालिबान्यांनी पाकिस्तानचे कान टोचले

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

कोरोनापाठोपाठ भारतात लवकरच धडकणार दुसरं मोठं संकट; मोदींनी बोलावली तात्काळ बैठक

CoronaVirus: ...तरीही चीननं आपल्या लोकांना देशाबाहेर पाठवलं; अमेरिकेचा चीनवर 'गंभीर' आरोप

CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार; इम्युनिटी कमी असलेल्या वयोवृद्धांचा धोका वाढणार

टॅग्स :cycloneचक्रीवादळCyclone Amphanअम्फान चक्रीवादळ