अम्मा समर्थकाने घेतले क्रूसावर खिळे ठोकून
By Admin | Updated: February 23, 2015 23:15 IST2015-02-23T23:15:20+5:302015-02-23T23:15:20+5:30
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता पुन्हा पदावर विराजमान व्हाव्यात, अशी आस लावून बसलेल्या निष्ठावंताने सोमवारी स्वत:ला चक्क क्रूसावर लटकवत हातापायाला खिळे ठोकून घेतल्याने खळबळ उडाली

अम्मा समर्थकाने घेतले क्रूसावर खिळे ठोकून
चेन्नई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता पुन्हा पदावर विराजमान व्हाव्यात, अशी आस लावून बसलेल्या निष्ठावंताने सोमवारी स्वत:ला चक्क क्रूसावर लटकवत हातापायाला खिळे ठोकून घेतल्याने खळबळ उडाली आहे. देवाला प्रार्थना करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले.
शिहान हुसेन याने क्रूसावर लटकवून घेतल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्या हातापायात ६ इंचीचे खिळे ठोकले. तो ६.७ मिनिटे क्रूसावर होता. मंगळवारी जयललिता यांचा ६७ वा वाढदिवस असल्याने त्यांच्याप्रति शुभकामना व्यक्त करतानाच देवाला साकडे घालण्यासाठी हे कृत्य केले. हा सर्व प्रकार घडत असताना अॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरांची चमू उभी होती. विशेष म्हणजे पोलिसांनी कोणताही अटकाव केला नाही.
दरम्यान, बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गेल्यावर्षी बेंगळुरू न्यायालयाने जयललिता यांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. (वृत्तसंस्था)